Tata Tiago EV Car: लवकरच भारतीय इलेक्ट्रिक व्हॅनच्या बाजारात मोठा धमाका होणार आहे. कारण देशातील प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी हातात मोटर्स आपली नवीन इलेक्ट्रिक हॅचबॅक कार लॉन्च करणार आहे. कंपनी आपली नवीन Tiago EV कार 28 सप्टेंबर रोजी लॉन्च करणार आहे. नवीन कार मल्टी-मोड रीजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम, क्रूझ कंट्रोल आणि स्पोर्ट्स-मोड्स सारख्या फीचर्ससह येण्याची अपेक्षा आहे. नवीन Tiago EV लॉन्च झाल्यानंतर देशातील सर्वात स्वस्त ईव्ही असू शकते.


Tata Tiago EV बॅटरी 


या अपकमिंग Tata Tiago इलेक्ट्रिक कारला 21.5kWh चा बॅटरी-पॅक मिळण्याची शक्यता आहे. याच्या एंट्री लेव्हल मोटर देखील मिळू शकते. जी जास्तीत जास्त 41hp पॉवर आणि 105Nm चा पीक-टॉर्क जनरेट करेल. तसेच यामध्ये देण्यात येणार बॅटरी-पॅक 15kW DC फास्ट चार्जरने 1 तास 50 मिनिटांत चार्ज केला जाऊ शकतो. Tata Tiago EV एका चार्जमध्ये 213km ची रेंज देण्यास सक्षम आहे, असं बोललं जात आहे.


Tata Tiago EV डिझाइन 


कंपनी डिझाइनमध्ये फारसा बदल न करता सध्याच्या ICE-पॉवर्ड Tiago प्रमाणे Tiago EV ठेवू शकते. तसेच Tigor आणि Nexon EV प्रमाणेच आगामी Tiago EV ला देखील कॉस्मेटिक ब्लू हायलाइट मिळण्याची शक्यता आहे. पण यात मेटल ग्रीलमध्ये बदल केले जाऊ शकतात.


Tata Tiago EV किंमत 


Tata Tiago EV या ऑक्टोबरमध्ये 5 लाख ते 7 लाख रुपयांच्या रेंजमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. तसेच टाटा आपले अपडेटेड Tata Nexon EV, Tiago EV आणि Altroz ​​EV मॉडेल लवकरच लॉन्च करण्याच्या योजनांवर काम करत आहे. जेणेकरून टाटाकडे या सेगमेंटमध्ये अधिकाधिक पर्याय बाजारात उपलब्ध असतील.दरम्यान, कार बाजारातील गतिविधी पाहता कार कंपनी आपले नवीन मॉडेल्स लॉन्च करण्यात व्यस्त आहेत. पण टाटाने ही हॅचबॅक कार बाजारात अपेक्षेप्रमाणे जवळपास तितक्याच किमतीत लॉन्च करणार, असे बोलले जात आहे. त्यामुळे इतर कंपन्यांसाठी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होऊ शकते.


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI