Volvo Luxury Bus: ऑटो एक्स्पो 2023 मध्ये स्वीडिश लक्झरी वाहन निर्माता ब्रँड Volvo ने आपली खास आणि अत्यंत लक्झरी बस सादर केली आहे. ही बस अनेक फीचर्सने  भरलेली आहे. ज्या क्षणी तुम्ही या बसमध्ये (Volvo Bus) पाऊल टाकाल तेव्हा तुम्हाला एखाद्या बिझनेस क्लासच्या विमानामध्ये आल्या सारखं वाटेल. या बसमध्ये (Volvo Bus) अनेक खास फीचर्स देण्यात आले आहेत. जे ग्राहकांना नक्कीच आवडतील. आज आम्ही तुम्हाला या बसशी (Volvo Bus) संबंधित सर्व खास माहिती सांगणार आहोत. 


Volvo Luxury Bus: कशी आहे व्होल्वो 9600 बस


व्होल्वोने या महिन्यात आयोजित ऑटो एक्सपो 2023 मध्ये त्यांची ही लक्झरी बस प्रदर्शित केली. ही बस (Volvo Bus) खूप मोठी आहे आणि आतून बिझनेस क्लासच्या फ्लाईटप्रमाणे आहे. यासोबतच यात अनेक लक्झरी फीचर्स देण्यात आले आहेत.


या व्होल्वो (Volvo Bus) बसची लांबी 15 मीटर असली तरी त्यात फक्त 10 जागा देण्यात आल्या आहेत. याच्या सीट्स एखाद्या विमानाप्रमाणे प्रीमियम लक्झरी अनुभव देतात. विमानाच्या फर्स्ट क्लासमध्ये ज्या प्रकारे आराम आणि सुविधा उपलब्ध आहेत, त्या सर्व गोष्टी या बसमध्ये (Volvo Bus) आहेत. बटन दाबल्यावर तुम्ही या बसच्या (Volvo Bus) सीटला आरामदायी खुर्ची आणि बेडमध्ये रूपांतरित करू शकता.


या बसमध्ये (Volvo Bus)प्रत्येक प्रवाशासाठी अतिशय आरामदायी सीट इन्फोटेनमेंट स्क्रीन देण्यात आली आहे, ज्यामध्ये प्रवासी त्यांचे आवडते चित्रपट (movie ) किंवा वेबसीरीज (webseries) पाहू शकतात. या स्क्रीनमध्ये बसचे 360 डिग्री व्ह्यू देखील पाहता येईल. या स्क्रीनच्या मदतीने तुम्ही प्रवासात स्वत:साठी जेवणही ऑर्डर करू शकता आणि गंमत म्हणजे तुमचे जेवण या बसमध्येच (Volvo Bus) तयार होईल आणि तुमच्या सीटवर पोहोचवले जाईल. या बसमध्ये (Volvo Bus)  बाथरूम-कम-टॉयलेट सेटअप देखील देण्यात आला आहे. यासोबतच या बसमध्ये (Volvo Bus) पॅनोरामिक विंडो आणि नॉइझलेस केबिनची सुविधाही देण्यात आली आहे.


दरम्यान, या आधुनिक बसचे व्होल्वो (Volvo Bus) अनेक प्रकार आणणार आहे. यासोबतच याला ग्राहकांच्या आवडीनुसार Customization देखील करता येते. या लक्झरी बसची किंमत अंदाजित सुमारे 2 ते 3 कोटी रुपये असू शकते.


इतर महत्वाची बातमी: 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI