Most Expensive Cycle in India: पुण्यातील एका कंपनीने आपल्या दोन नवीन इलेक्ट्रिक सायकल लॉन्च केल्या आहेत. या भारतातील सर्वात महाग इलेक्ट्रिक सायकल आहे. या सायकलच्या किंमतीत तुम्ही नवीन रॉयल एनफिल्ड (Royal Enfield) देखील खरेदी करू शकतात. कोणत्या आहेत या दोन इलेक्ट्रिक सायकल आणि यात काय आहे खास हे जाणून घेऊ...  


Most Expensive Cycle in India: कोणती आहे ही सायकल आणि किंमत किती? 


E-Motorad कंपनीने या इलेक्ट्रिक बाईक लॉन्च केल्या आहेत. ज्यांचं नाव डेझर्ट ईगल (Desert Eagle) आणि नाईटहॉक (Night Hawk) असं आहे. याची किंमत अनुक्रमे 4.75 लाख आणि 5 लाख रुपये आहे. या दोन्ही ई-सायकल्स कंपनीचे नवीन फ्लॅगशिप मॉडेल आहेत. जे भारतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात विकले जातील.


आपल्या फ्लॅगशिप ई-बाईक व्यतिरिक्त, कंपनीने अधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी  24,999 ते 32,999 रुपयांपर्यंतच्या ई-सायकलची सीरीज देखील सादर केली आहे. सर्व सायकल ऑन-बोर्ड इलेक्ट्रिक मोटर आणि बॅटरी पॅकसह येतात.


डेझर्ट ईगल आणि नाईटहॉक ई-सायकल तयार करताना मजबुतीची विशेष काळजी घेण्यात आली असून त्यानुसार त्यामध्ये उच्च दर्जाचे पार्टस बसवण्यात आले आहेत. ही सायकल खडकाळ पर्वतांमध्येही पूर्ण ताकदीने परफॉर्म करेल. यात ऑफ-रोड रायडिंगनुसार टायर आणि ब्रेकिंग सिस्टिम देण्यात आली आहे. यासाठी दोन्ही मॉडेल्समध्ये 17.5Ah बॅटरी पॅक आहे. जो अॅल्युमिनियम फ्रेम दरम्यान ठेवला आहे.


Most Expensive Cycle in India: 105 किमीची देणार रेंज


यात 250W इलेक्ट्रिक मोटर पेडल आहे. कंपनीने दावा केला आहे की, ही ई-सायकल पूर्ण चार्ज केल्यावर 105 किमी पर्यंतची रेंज देते. दोन्ही मॉडेल्समध्ये पुढील आणि मागील बाजूस रॉकशॉक्स सस्पेन्शन आहे, जे आरामदायी राईडसाठी महत्वाचं काम करतात.


X-फॅक्टर सीरीज तीन सेगमेंटमध्ये विभागली गेली आहे. यात X1, X2 आणि X3 चा समावेश आहे. अल्ट्रा-प्रिमियम रेंजच्या तुलनेत, X-फॅक्टर मॉडेल्समध्ये MTB फ्रेमवर आधारित X1 आणि X3 सह स्टील बांधकाम वैशिष्ट्यीकृत आहे. तर X2 मध्ये युनिसेक्स फ्रेम आहे.


X1 आणि X2 ला वेगळी बॅटरी मिळते तर X3 अंगभूत बॅटरीसह येते. इलेक्ट्रिक मोटर मागील चाकाच्या हबमध्ये बसविली जाते आणि ती 30 किमी पर्यंतची रेंज देऊ शकते. मॉडेल्स पॉवर सहाय्याचे निवडण्यायोग्य स्तर देखील देतात. या सायकलमध्ये अॅप कनेक्टिव्हिटीचा पर्याय देखील ग्राहकांना मिळतो. नवीन एक्स-फॅक्टर रेंज लॉन्च केल्यानंतर कंपनी भारतातील टियर 3 आणि टियर 4 शहरांमध्ये आपली पोहोच वाढवण्याची योजना आखत आहे.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI