Volvo XC60 Black Edition : व्होल्वो (Volvo) इंडिया ऑटोमेकर कंपनीने आपल्या 2024 XC60 मॉडेलसाठी ब्लॅक एडिशन व्हेरिएंट लॉंच केलं आहे. या कारमध्ये अनेक नवीन वैशिष्ट्य सादर करण्यात आली आहेत. या कारचा लूक आणि प्रेझेन्स स्टायलिंग वाढवत कंपनीने त्यात एक चमकदार ब्लॅक लोगो आणि वर्डमार्क दिला आहे. या व्हेरिएंटमध्ये ग्लॉस-ब्लॅक 21-इंच पाच-स्पोक अलॉय व्हील देण्यात आले आहेत. तर बॉडीला ब्लॅक ओनिक्स पेंटसह अतिशय आलिशान लूक देण्यात आला आहे.


XC60 ब्लॅक एडिशन इंटिरियर कसे आहे?


व्होल्वो XC60 ब्लॅक एडिशनच्या इंटीरियरबद्दल सांगायचे तर, ते ब्लॅक हेडलाईनर आणि चारकोल इंटीरियरसह डिझाईन केले गेले आहे. हे दोन सीट अपहोल्स्ट्री ऑप्शनमध्ये दिले जाते. कॉन्ट्रास्टिंग मेश अॅल्युमिनियम अॅक्सेंट आणि ऑरफोर्स क्रिस्टल गियर शिफ्ट नॉब देखील त्याच्या इंटीरियरच्या पृष्ठभागावर जोडले गेले आहेत.


2024 व्होल्वो XC60 ब्लॅक एडिशन पॉवरट्रेन


नवीन Volvo XC60 च्या ब्लॅक एडिशनमध्ये दोन पॉवरट्रेन ऑप्शन देण्यात आले आहेत. पहिला पर्याय B5 आहे, जो 48-V लाईट-हायब्रीड टेक्नॉलॉजीसह चार-सिलेंडर इंजिनसह सुसज्ज आहे. हा सेटअप 4.5 सेकंदात 96 किमी/ताशी वेग मारू शकतो आणि 244 Bhp ची कमाल पॉवर जनरेट करतो. तर दुसरा पर्याय म्हणजे T8, जो प्लग-इन हायब्रीड पॉवरट्रेन आहे. जो 449 Bhp पॉवर जनरेट करतो, ज्यासह कार फक्त 4.5 सेकंदात 60 mph पर्यंत वेग वाढवू शकते. पॉवरट्रेनच्या दोन्ही पर्यायांमध्ये वेगवेगळे परफॉर्मन्स, पॉवर आणि ड्रायव्हिंगचा अनुभव अनुभवता येतो. 


Volvo XC60 Black Edition ची किंमत किती असेल?


XC60 ब्लॅक एडिशन 2022 मध्ये रिफाइनमेंटसह लॉन्च होणार्‍या S60 ब्लॅक एडिशनशी बरेच साम्य सामायिक करते. Volvo ने 2022 साठी S60 ब्लॅक एडिशन सेडानची फक्त 450 युनिट्स उपलब्ध करून दिली. तसेच, 2024 Volvo XC60 ब्लॅक एडिशनसाठी अशी कोणतीही मर्यादा सेट केलेली नाही. भारतात त्याची विक्री 2023 च्या चौथ्या तिमाहीत सुरू होण्याची अपेक्षा आहे. 


Volvo XC60 Black Edition 'या' कारशी करणार स्पर्धा 


Volvo XC60 Black Edition ही कार मर्सिडीज बेंझ जीएलसी वर्गाशी स्पर्धा करते. हे दोन व्हेरिएंटमध्ये आणि दोन पॉवरट्रेन ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 73.50 लाख रुपयांपासून सुरू होते.


महत्त्वाच्या बातम्या :


Hyundai Venue Knight Edition : Hyundai Venue चे Night Edition भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि खास वैशिष्ट्य


Car loan Information:

Calculate Car Loan EMI