Hyundai Venue Knight Edition : दिग्गज कार निर्मात्या कंपनींपैकी एक म्हणजेच ह्युंदाई कंपनी. Legendary कार उत्पादक कंपनी Hyundai ने आपल्या सब-कॉम्पॅक्ट SUV व्हेन्यूचे नवीन व्हर्जन लॉन्च केलं आहे. विशेष म्हणजे कंपनीने कारचा लूक पूर्णपणे ब्लॅक कलरचा केला आहे. ब्लॅक आउट लूक असलेली ही नाईट एडिशन आहे. या कारच्या कलर ऑप्शनबद्दल बोलायचे झाल्यास, ही कार 4 मोनोटोन आणि 1 ड्युअलटोन कलरमध्ये येते. ज्यामध्ये अॅबिस ब्लॅक, अॅटलस व्हाईट, टायटन ग्रे, फायरी रेड आणि अॅबिस ब्लॅकचा समावेश आहे.
Hyundai Venue Knight Edition च्या इंटीरियरबद्दल बोलायचे झाल्यास व्हेन्यू नाईट एडिशन क्रेटा नाईट एडिशन प्रमाणेच आहे. या कारमध्ये ब्लॅक कलरची फ्रंट ग्रिल, ह्युंदाई लोगो, ब्रास कलरचा फ्रंट आणि रियर बंपर इन्सर्ट आहे.
Hyundai Venue Knight Edition या कारला पुढच्या चाकांवर ब्रास कलरचे इन्सर्ट, सेम कलरचा रूफ आणि डार्क क्रोम मागील Hyundai लोगो मिळतात. तसेच, तुम्हाला ब्लॅक कलरची हायलाईट रेल, शार्क-फिन अँटेना आणि लाल फ्रंट ब्रेक कॅलिपरसह ORVM मिळतात. ब्लॅक कलरची अलॉय व्हील/व्हील कव्हर्स, ब्लॅक फ्रंट आणि रिअर स्किड प्लेट्स, बॉडी कलर डोअर हँडल यांचा देखील समावेश आहे.
Hyundai Venue Knight Edition च्या इंटिरिअर्स बद्दल बोलायचे झाल्यास, या कारमध्ये ब्रास कलरच्या इन्सर्टसह ब्लॅक सीट अपहोल्स्ट्री आणि ब्रास कलर हायलाईट्स संपूर्ण ब्लॅक लूक पूर्ण करतात. वैशिष्ट्यांमध्ये आता ड्युअल कॅमेरे आणि मेटल पॅडलसह डॅशकॅम समाविष्ट आहे.
व्हेन्यूज नाईट एडिशन (Venue Knight) S(O) आणि SX व्हेरिएंटना मॅन्युअल ट्रान्समिशनसह 1.2L पेट्रोल इंजिन मिळेल आणि SX(O) प्रकारात 6MT आणि 7DCT सह 1.0L टर्बो पेट्रोल इंजिन मिळेल. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, या कारची किंमत 9.99 लाख रुपयांपासून सुरू होते तर टॉप-एंड व्हेरिएंटची किंमत 13.4 लाख रुपयांपर्यत आहे.
Hyundai नुकतेच Xeter लॉन्च केले आहे. लवकरच कंपनी नवीन कार आणण्यासाठी सज्ज आहे. एक्सेटरला काही सेगमेंट फर्स्ट फीचर्स मिळतात. यात सहा एअरबॅग्ज, सेल्फी पर्यायासह ड्युअल कॅमेरा डॅशकॅम, व्हॉईस कंट्रोल्ड सनरूफ, कनेक्टेड सूटसह 8-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 4.2-इंचाचा मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्ले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Car loan Information:
Calculate Car Loan EMI