Tiguan Facelift Review: फोक्सवॅगननं यावर्षी नवीन टिगुआन कॉम्पॅक्ट एसयूव्ही लॉन्च केली होती. त्यानंतर कंपनीनं आणखी एका एसयूव्ही कारच्या लॉन्चिंगची घोषणा केलीय. टिगुआन एक मिडसाईज प्रीमिअम एसयूव्ही आहे आणि भारतीय बाजारात याआधीही या कारची विक्री झालीय. नवीन टिगुआन अधिक अग्रेसिव्ह आणि प्रीमियम लूकमध्ये मिळत आहे. ही एसयूव्ही कार बाजारात दाखल होताच मोठ्या प्रमाणात ग्राहकांची पसंती मिळवेल, असा विश्वासही व्यक्त केला जातोय.
इंटीरिअर आणि व्हील साइज
या कारमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. एवढेच नव्हेतर, रिअर स्टाईललाही नव्या एलईडी टेल-लॅम्प आणि नवीन बंपरसह अपडेट करण्यात आलंय. यात 18 इंचाचे अलॉय व्हील देखील देण्यात आले आहे. तसेच या कारमध्ये आकर्षित असे कलर पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलंय. कारमध्ये स्टीयरिंग व्हीलच्या फिनिशिंगपासून सॉफ्ट टच मटेरियलपर्यंत सर्व काही उच्च दर्जाचे आहे. कारच्या केबिनचे डिझाईन कंजर्वेटिव्ह वाटू शकतात. परंतु, याची गुणवत्ता अतिशय चांगली आहे.
इन्फोटेनमेन्ट सिस्टम
टीगआन कारमध्ये नव्या इन्फोटेनमेन्ट सिस्टमसह 8 इंचचा टचस्क्रीन देण्यात आला आहे. तर, नवीन इंस्ट्रमेन्ट क्लस्टरदेखील डिजीटल आहे. टचस्क्रीनचा फीडबॅकही चांगला आहे. तसेच या कारसाठी तयार करण्यात आलेल्या नव्या मेन्यूसह टच रिस्पॉन्सही ग्राहकांना पसंत येत आहे.
फीचर्स
ही एक पूर्णपणे लोड केलेले मॉडेल आहे. स्पर्धकांच्या तुलनेत या कारमध्ये बऱ्याच आकर्षित गोष्टी मिळतात. यूएसबी सी पोर्ट, पॅनोरामिक सनरूफ, थ्री झोन क्लायमेट कंट्रोल, 30 मूड लाइटिंग पर्यायांसह एम्बिएन्ट लायटिंग, लेदर अपहोल्स्ट्री, कनेक्टेड कार टेक्नोलॉजी आणि हॉट सीट्ससह बरेच काही आहे. जेव्हा एक रिअर व्ह्यू कॅमेरा असतो, त्यावेळी 360 डिग्री कॅमेरा अपेक्षित असतो. सुरक्षिततेच्या दृष्टीनं तुम्हाला 6 एअरबॅग्ज, फ्रंट आणि रियर डिस्क ब्रेक, हिल स्टार्ट असिस्ट, हिल डिसेंट कंट्रोल, ऑटो होल्ड इत्यादी गोष्टी मिळतात.
इंजिन आणि पॉवर
टीगआनच्या मागील कारच्या तुलनेत नव्या कारमध्ये टर्बो पेट्रोल 2.0-लिटर इंजिन आहे. जे 190 पीएस पॉवर आणि 320 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. यासह, गिअरबॉक्स 7-स्पीड DSG तसेच 4MOTION ऑल-व्हील-ड्राइव्ह सिस्टम आहे.
किंमत
31.9 लाख रुपये किमतीची टीगआन थोडी महाग आहे, पण चांगली प्रीमियम एसयूव्ही आहे. तसेच परफॉर्मस क्वालिटी आणि फिचर्सही दमदार आहेत. ही कार एका महागाड्या एसयूव्ही कारसारखी दिसते. ज्यामुळं या कारची किंमती थोडी जास्त आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
- खड्ड्यांची माहिती देणारं सरकारी अॅप; रस्ते अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून नेव्हिगेशन अॅप लाँच
- Electric Car: 15 लाखांपेक्षा कमी किमतीच्या ईलेक्ट्रीक कार लवकरच भारतीय बाजारात
- New MG Motor EV : MG Motor बाजारात आणणार नवी SUV
Car loan Information:
Calculate Car Loan EMI