Electric Car: 15 लाखांपेक्षा कमी किमतीच्या ईलेक्ट्रीक कार लवकरच भारतीय बाजारात
Tata Altroz EV: 2020 च्या ऑटो एक्स्पोमध्ये Tata Altroz EV ला प्रदर्शित केले होते. ही इलेक्ट्रीक कार Tigor पेक्षा मोठी असेल. परंतु, या कारची किंमत Nexon EV च्या जवळ असेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppHyundai EV SUV: Hyundai कंपनी त्यांची Hyundai EV SUV इलेक्ट्रीक कार तयार करीत आहे. ही इलेक्ट्रीक कारला भारतीय बाजारात दाखल होण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी लागणार आहे.
Toyota Hyryder: मारुती कंपनीचे भागीदार टोयोटा भारतीय बाजारात त्यांची इलेक्ट्रीक कार दाखल करण्याचा तयारीत आहे. ही कार Toyota Hyryder Wagon R वर आधारीत असेल. परंतु, या कारचा लूक वेगळा असेल. ही भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार ठरू शकते.
MG EV SUV: MG ची इलेक्ट्रीक कार लवकरच भारतीय बाजारात दाखल होणार आहे. नवीन MG EV जागतिक प्लॅटफॉर्मवर आधारित असेल, परंतु या कारची किंमत कमी ठेवण्याचा कंपनीचा प्रयत्न असेल. ही कार नेक्सॉन इलेक्ट्रीक कार पेक्षा स्वस्त असेल.
GWM Ora R1: GWM इलेक्ट्रीक कार भारतात कधी लॉन्च होणार? याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही. पण गेल्या एक्सपोमध्ये त्याने ORA R1 चे प्रदर्शन केले होतं. GWM ची ही सर्वात स्वस्त आहे. या छोट्या कारसाठी तुम्ही 400 किलोमीटरच्या रेंजचीही अपेक्षा करू शकता. GWM भारतात कार लॉन्च करण्याचं नियोजन रखडले आहे. यामुळं ही कार भारतात कधी लॉन्च होते? याकडं सर्वांच लक्ष लागलंय.