Toyota Kirloskar: जपानी वाहन उत्पादक कंपनी पुढील 2 वर्षात भारतीय बाजारपेठेत आपल्या वाहनांची मोठी रेंज आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीने गेल्या वर्षी भारतात नवीन Glanza, Urban Cruiser Highrider SUV आणि Innova Highcross MPV लॉन्च केली. आता कंपनी 2025 पर्यंत आपल्या 5 नवीन कार भारतात बाजारात आणणार आहे. कंपनी आपल्या कोणता कार्स लॉन्च करू शकते, याची संपूर्ण लिस्ट पाहू...
टोयोटा इनोव्हा क्रिस्टा
टोयोटा लवकरच भारतीय बाजारपेठेत अपग्रेडेड इनोव्हा क्रिस्टा डिझेल लॉन्च करणार आहे. नवीन क्रिस्टा ऑनलाइन किंवा कंपनीच्या डीलरशिपद्वारे 50,000 रुपये भरून बुक करता येईल. या कारमध्ये नवीन 2.4L टर्बो डिझेल इंजिन देऊ शकते. जे 148bhp पॉवर जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. हे इंजिन आगामी BS6 स्टेज 2 किंवा RDE उत्सर्जन मानदंड पूर्ण करते. यात इको आणि पॉवर असे दोन ड्राइव्ह मोड मिळतील. कार 4 ट्रिम स्तरांमध्ये आणि 7 आणि 8-सीटिंग कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध असेल.
टोयोटा A15 SUV कूप
टोयोटा आपली नवीन सब-4 मीटर एसयूव्ही देशात लॉन्च करू शकते. या SUV ला A15 कोडनेम देण्यात आले आहे. नवीन मारुती सुझुकी फ्रॉन्क्स एसयूव्ही कूपची ही री-बॅज केलेलं व्हर्जन असेल. परंतु हे नवीन मॉडेल फ्रँक्सपेक्षा बरेच वेगळे दिसू शकते. यारिस क्रॉस प्रमाणेच डिझाईन तपशील त्यात आढळू शकतात. ही कार Hyundai Venue, Renault Kiger, Nissan Magnite सारख्या कारची असेल. कारला 1.0L बूस्टरजेट 3-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन मिळेल. ज्यामध्ये माईल्ड हायब्रिड तंत्रज्ञान आहे. यासह माईल्ड हायब्रिड तंत्रज्ञानासह 89bhp पॉवर जनरेट करणार्या 1.2L Dualjet पेट्रोल इंजिनचा पर्याय असेल.
टोयोटा D23 MPV
टोयोटा या वर्षाच्या शेवटी देशात मारुती एर्टिगा एमपीव्हीची रीबॅज केलेलं व्हर्जन लॉन्च करणार आहे. MPV कोडनाव D23 दक्षिण आफ्रिकेत Rumion म्हणून विकले जाते. यात 1.5-लिटर, 4-सिलेंडर K15C ड्युअलजेट इंजिन या नवीन टोयोटा 7-सीटर रुमियनला पॉवर देण्यासाठी वापरले जाईल. हे इंजिन 103bhp आणि 136Nm पॉवर निर्माण करण्यास सक्षम आहे. यात 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिकचा पर्याय मिळेल.
टोयोटा कोरोला क्रॉस बेस्ड 3-रो एसयूव्ही
टोयोटा भारतीय बाजारपेठेत नवीन 7-सीटर SUV लॉन्च करणार आहे. जी Corolla Cross SUV वर आधारित असेल. ही कार TNGA-C प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. नवीन 7-सीटर SUV महिंद्रा XUV700 आणि जीप मेरिडियनशी टक्कर देईल. कारला 2.0-लीटर नैसर्गिक-अॅस्पिरेटेड पेट्रोल आणि 2.0-लीटर पेट्रोल इंजिनचा पर्याय मिळेल, जे अनुक्रमे 172bhp आणि 186bhp जनरेट करण्यास सक्षम आहेत.
टोयोटा इलेक्ट्रिक एसयूव्ही
टोयोटा सुझुकीसोबत भागीदारीत नवीन इलेक्ट्रिक एसयूव्हीवर काम करत आहे. ही कार नवीन स्केटबोर्ड प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. हे प्लॅटफॉर्म टोयोटाच्या 40PL इलेक्ट्रिक आर्किटेक्चरमधून घेतले आहे. ही कार 2025 पर्यंत बाजारात येईल. कारला 60kWh बॅटरी पॅक मिळण्याची अपेक्षा आहे, जी 500kms पेक्षा जास्त रेंज देण्यास सक्षम असेल.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI