Citroen New Electric Car : भारत इलेक्ट्रिक वाहनांच्या सेगमेंटमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढल्याने कार उत्पादक एकामागून एक आपापल्या इलेक्ट्रिक कार सादर करण्यात गुंतले आहेत. आता फ्रेंच कार निर्माता कंपनी Citroen ने देखील आपली इलेक्ट्रिक कार Citroen EC3 भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. ही कार दोन ट्रिममध्ये सादर करण्यात आली आहे. देशांतर्गत बाजारात ही इलेक्ट्रिक कार टाटाच्या टियागोला टक्कर देईल. कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक कारमध्ये अनेक आधुनिक फीचर्स दिले आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...


Citroen New Electric Car: किती आहे किंमत? 


कंपनीने Citroen EC3 कार 11.50 ते 12.43 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत सादर केली आहे. जी याच्या ICE प्रकारापेक्षा 5.5 लाख रुपये जास्त आहे. याची प्रतिस्पर्धी Tata Tiago Electric पेक्षा ही कार 1.31 लाख रुपये महाग आहे. 


Citroen New Electric Car: पॉवर आणि चार्जिंग 


Citroen EC3 कारमध्ये कंपनीने 29.2kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे. ज्याची ARAI परमिट रेंज 320 किमी आहे. या इलेक्ट्रिक कारमध्ये सिंगल इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे, जी कारच्या पुढील चाकाला कमाल 57PS पॉवर आणि 143NM चा पीक टॉर्क जनरेट करेल. या इलेक्ट्रिक कारचा टॉप स्पीड 107 किमी/तास आहे. याशिवाय ही कार चार्ज करण्यासाठी दोन चार्जिंग पर्याय उपलब्ध आहेत. पाहिलं 15A चार्जिंग सॉकेट जे ही कार पूर्णपणे चार्ज करण्यासाठी 10 तास 30 मिनिटे घेते. सेकंड डीसी फास्ट चार्जर, जे केवळ 57 मिनिटांत ही कार 10-80 टक्के चार्ज करण्यास सक्षम आहे.


Citroen New Electric Car: फीचर्स 


Citroen EC3 कारमध्ये दिलेल्या फीचर्सबद्दल सांगायचे तर, यात मॅन्युअल एसी, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, कीलेस एंट्री, उंची अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, पॉवर विंडो, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले 10 इंच टचस्क्रीन सिस्टम, कनेक्टेड कार तंत्रज्ञान यांसारखे फीचर्स आहेत. 


Citroen New Electric Car: कव्हरेज


Citroen या इलेक्ट्रिक कारच्या बॅटरीवर सात वर्षांची किंवा 1.4 लाख किमीची वॉरंटी देत ​​आहे, जी तिच्या प्रतिस्पर्धी टाटा टियागो इलेक्ट्रिकपेक्षा कमी आहे. कंपनी टाटा टियागो इलेक्ट्रिकवर आठ वर्षे आणि 1.6 लाख किमीची वॉरंटी देत आहे.


इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातमी: 


Upcoming Triumph Bike: ट्रायम्फ स्ट्रीट ट्रिपल 765 रेंज बाईक पुढील महिन्यात होणार लॉन्च, जाणून घ्या काय असेल खास


Car loan Information:

Calculate Car Loan EMI