Upcoming Tata Cars: प्रसिद्ध भारतीय वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्स पुढील 2 ते 3 वर्षात देशाच्या बाजारपेठेत विविध सेगमेंटमध्ये अनेक नवीन मॉडेल्स आणणार आहे. यात न्यू जनरेशन नेक्सन आणि टियागोचाही समावेश आहे. तसेच कंपनीची Curve SUV 2024 मध्ये आणि Sierra SUV 2025 मध्ये ICE आणि EV पॉवरट्रेनसह लॉन्च केली होऊ शकते. यासोबतच कंपनी पुढील वर्षी हॅरियर एसयूव्हीचे इलेक्ट्रिक व्हर्जनही लॉन्च करणार आहे. कंपनीच्या अपकमिंग कार्समध्ये ग्राहकांना काय खास मिळू शकतं, याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ...  


Upcoming Tata Cars: टाटा कर्व


Tata Curvv SUV कंपनीने यावर्षीच्या ऑटो एक्स्पोमध्ये कॉन्सेप्ट मॉडेल म्हणून प्रदर्शित केली होती. हे मॉडेल कंपनीच्या दुसऱ्या पिढीच्या ईव्ही आर्किटेक्चरवर आधारित असेल. ज्यावर एका मोठ्या बॅटरी पॅकसह अनेक बॉडी स्टाइल आणि पॉवरट्रेन सामावून घेता येतील. ही SUV पेट्रोल आणि इलेक्ट्रिक पॉवरट्रेन या दोन्ही पर्यायांमध्ये येईल. कंपनीचे नवीन 1.2L टर्बो इंजिन त्याच्या पेट्रोल आवृत्तीमध्ये आढळू शकते, जे 125PS ची पॉवर आणि 225 Nm टॉर्क जनरेट करू शकते. ही कार मारुती ग्रँड विटारा आणि ह्युंदाई क्रेटाशी स्पर्धा करेल.


Upcoming Tata Cars: टाटा हॅरियर ईव्ही


टाटा हॅरियर इलेक्ट्रिकची डिझाइन टाटाच्या जनरल 2 प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल. कंपनीने 2023 ऑटो एक्सपोमध्ये ही कार शोकेस केली होती. ही त्यांच्या ICE आवृत्तीसारखीच असेल. यात नवीन ब्लँक-ऑफ ग्रिल, पुनर्डिझाईन केलेल्या एलईडी लाईट बार्ससह स्प्लिट हेडलॅम्प, ब्लॅक हाऊस, सुधारित बंपर आणि अँगुलर क्रिझ मिळणार. तसेच यात फ्लश डोअर हँडलसह फेंडरवर 'EV' बॅज मिळेल.


Upcoming Tata Cars: टाटा सिएरा


टाटा सिएरा दिल्ली ऑटो एक्सपो 2023 मध्ये शोकेस करण्यात आली होती. या SUV ची लांबी सुमारे 4.3 मीटर आहे आणि ती Gen 2 प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल. Curvv प्रमाणे, सिएरा पेट्रोल आणि इलेक्ट्रिक पॉवरट्रेन पर्यायांसह ऑफर केली जाईल. याच्या पेट्रोल मॉडेलमध्ये नवीन 1.5 लीटर, 4-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन मिळू शकते. याच्या इलेक्ट्रिक आवृत्तीमध्ये पॉवरफुल मोटर मिळू शकते. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये 60kWh बॅटरी पॅक समाविष्ट असू शकतो, जो सुमारे 500 किमीची रेंज ऑफर करेल, अशी अपेक्षा आहे.


Upcoming Tata Cars: टाटा नेक्सन आणि टियागो


टाटा मोटर्स आपली नवी पिढी Nexon आणि Tiago लवकरच बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. मात्र या मॉडेल्सबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. Tata Curvv कॉन्सेप्टसारखे काही डिझाइन एलिमेंट्स नवीन Nexon मध्ये आढळू शकतात. तसेच यात नवीन स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि व्हॉईस कमांड फंक्शन, एक नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळू शकते. पुढील-जनरल Nexon ला नवीन 1.2L टर्बो पेट्रोल इंजिन मिळू शकते, जे 125bhp पॉवर आणि 225 Nm टॉर्क जनरेट करेल.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI