Maruti Suzuki Ciaz vs Honda City : जर तुम्ही सेडान कार घेण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. कारण या ठिकाणी आम्ही मारुती सुझुकीची सियाझ (Maruti Suzuki Ciaz) आणि सेडान सेगमेंटमधील दुसरी लोकप्रिय कार होंडा सिटी (Honda City) या कारची तुलना करणार आहोत. या दोन्ही कारमध्ये वेगळं कोणतं वैशिष्ट्य आहे, हे या निमित्ताने जाणून घेण्याचा प्रयत्न आहे.    


कोणती कार सर्वात मोठी? 


दोन्ही सेडान कारच्या आकाराबद्दल बोलायचे झाल्यास, Honda City e:HEV हायब्रिड कारची लांबी 4549mm, रुंदी 1748mm आणि उंची 1489mm आहे. तर, मारुतीची सियाझ हायब्रिड, होंडा सिटीपेक्षा आकाराने थोडी लहान आहे. त्याची लांबी 4490 मिमी, रुंदी 1730 मिमी आणि उंची 1485 मिमी आहे. होंडा सिटीचा व्हीलबेस 2600 मिमी आहे, जो मारुती सियाझच्या 2650 व्हीलबेसपेक्षा किंचित लहान आहे.


डिझाइन कशी आहे?


मारुती सियाझ सेडान कारच्या पुढील बाजूस एक क्रोम ग्रिल देण्यात आला आहे. यामुळे कारचा लूक अधिक आकर्षक वाटतो. यामध्ये दिलेली अलॉय व्हील्स त्याच्या साईड प्रोफाइलला उत्तम लूक देतात. याशिवाय एलईडी हेडलाईट्स, डीआरएल, प्रोजेक्टर हेडलाईट्स आणि एलईडी फॉग लाईट्स यांसारखे लाईटिंग फिचर्स मिळतात. तर, नवीन होंडा सिटी सेडानला ब्लॅक-आउट ग्रिल, बूट लिडवर E:HEV बॅजिंग, DRLs, LED हेडलॅम्प मिळतात. याशिवाय कारच्या बाजूला ब्लॅक-आऊट बी-पिलर आणि मल्टी-स्पोक अलॉय व्हील देखील देण्यात आले आहेत.


कोणत्या कारचं इंजिन बेस्ट आहे? 


मारुती सुझुकी आपल्या Ciaz मध्ये 1,462cc BS6 1.5 L K15-Smart Hybrid पेट्रोल इंजिन देते, जे 105PS पॉवर आणि 138Nm टॉर्क जनरेट करते. तर, Honda ने 1.5-L पेट्रोल-हायब्रिड इंजिनसह आपली नवीन Honda City लाँच केली आहे, जे 125hp ची कमाल पॉवर आणि 253Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये 5-स्पीड MT, CVT किंवा E-CVT गिअरबॉक्स जोडण्यात आला आहे.


किंमत किती? 


मारुती सुझुकी सियाझची किंमत 9.19 लाखांपासून सुरु होते ती 12.34 लाखांपर्यंत आहे. Honda City चे i-VTEC मॉडेल 11.49 लाख रुपये किमतीत लॉन्च करण्यात आलं आहे आणि त्याचे e-HEV मॉडेल 18.89 लाख रुपये (एक्स-शोरूम) लाँच करण्यात आलं आहे.


मारुतीची सियाझ किंमतीच्या बाबतीत स्वस्त आहे. पण अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने पाहिल्यास होंडा सिटीमध्ये अपडेटेड फिचर्स आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


BMW 520D M Sport : BMW 5 सीरीजची नवीन 520D M स्पोर्ट कार लॉन्च; जबरदस्त फीचर्स आणि किंमत पाहा


Car loan Information:

Calculate Car Loan EMI