Mid Size SUVs: सध्या देशात मध्यम आकाराच्या एसयूव्ही कारला खूप मागणी आहे. हे पाहता या सेगमेंटमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक नवीन गाड्या बाजारात आल्या आहेत आणि यंदाही हा ट्रेंड कायम राहणार आहे. कारण जानेवारीमध्ये ऑटो एक्स्पोचे आयोजन केले जाणार आहे. या शोमध्येही मिड साइज एसयूव्हीच्या सेगमेंटमध्ये अनेक नवीन गाड्या येणार आहेत. चला जाणून घेऊया या अपकमिंग कारबद्दल...


Upcoming SUVs: ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट


Hyundai Creta ही भारतातील मध्यम आकाराच्या SUV सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. लवकरच Hyundai Creta चे मिड-लाइफ फेसलिफ्ट अपडेट पाहायला मिळणार आहे. या कारमध्ये ADAS सेफ्टी फीचर उपलब्ध असेल. कंपनी या कारमध्ये आधीच्या मॉडेलमधलेच इंजिन देऊ शकते.


Upcoming SUVs: किआ सेल्टोस फेसलिफ्ट


Kia भारतातील सर्वात लोकप्रिय SUV Seltos ला देखील मोठे अपडेट देणार आहे. अनेक कॉस्मेटिक बदलांसह कारला नवीन लूक मिळेल. यात समोरील बाजूस मोठी ग्रिल, नवीन एलईडी डीआरएल प्लेसमेंट आणि नवीन अलॉय व्हील्स मिळेल. या कारमध्ये सध्याच्या सेल्टोसप्रमाणे 1.5-लिटर पेट्रोल, 1.4-लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.5-लिटर डिझेल पॉवरट्रेन मिळेल. यासोबतच नवीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, कनेक्टेड-कार फीचर्स, एक मोठा पॅनोरॅमिक सनरूफ देखील मिळू शकतो.


Upcoming SUVs: एमजी हेक्टर फेसलिफ्ट


एमजी मोटर इंडियाने आपल्या हेक्टर फेसलिफ्टचे उत्पादन सुरू केले आहे. नवीन एमजी हेक्टर भारतात जानेवारीमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. यात नवीन मोठे लोखंडी ग्रील, नवीन डिझाइन केलेले हेडलॅम्प, टेलगेटच्या रुंदीमध्ये एक नवीन क्रोम स्ट्रिप, नवीन कनेक्ट केलेल्या फीचर्ससह 14-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि ADAS देखील मिळेल.


Upcoming SUVs: टाटा हॅरियर फेसलिफ्ट


टाटा हॅरियर फेसलिफ्ट काही काळापूर्वी टेस्टिंग दरम्यान दिसली आहे. ही कार लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. स्पॉट केलेल्या फोटोमध्ये असे दिसून येते की, 2023 हॅरियरला त्याच्या बाह्य डिझाइनमध्ये कमीत कमी बदल केले जातील. या नवीन SUV ला एक मोठी इन्फोटेनमेंट स्क्रीन, अनेक नवीन फीचर्ससह एक अपडेटेड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि प्रगत ड्रायव्हर सहाय्यता प्रणाली मिळेल.


इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातमी: 


SEAT Mo 50 Electric Scooter: 'या' कंपनीने लॉन्च केली पॉवरफुल इलेक्ट्रिक स्कूटर, एका चार्जमध्ये धावणार 172 किलोमीटर


Car loan Information:

Calculate Car Loan EMI