SEAT Mo 50 Electric Scooter: जगभरात इलेक्ट्रिक वाहनांचा ट्रेंड वाढत आहे. हे पाहता अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपली इलेक्ट्रिक वाहने नवीन फीचर्ससह बाजारात आणत आहेत. यातच आता स्पॅनिश कार उत्पादक SEAT ने Mo 50 'एंट्री-लेव्हल' इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर शॉर्ट राइडच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे. SEAT Mo 50 ही कंपनीची दुसरी इलेक्ट्रिक स्कूटर आहे. कंपनीची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर Mo 125 होती, जी या वर्षी नोव्हेंबरमध्ये लॉन्च करण्यात आली होती. 

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 5.6 kWh ची बॅटरी आणि 7.3 kW ची इलेक्ट्रिक मोटर आहे. ही मोटर 9.7 bhp पॉवर देते. SEAT चा दावा आहे की Mo 50 ची कमाल रेंज पूर्ण चार्ज केल्यावर 172 किमी आहे. राइडिंगसाठी, ग्राहकांना सिटी, स्पोर्ट आणि इको असे 3 मोड मिळतात. यात मागील बाजूस प्री-लोडेड अॅडजस्टेबल मोनोशॉक आणि समोरील बाजूस टेलिस्कोपिक फॉर्क्स आहेत. ब्रेकिंगसाठी दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.

SEAT Mo 50 Electric Scooter: किंमत किती? 

सध्या कंपनीने या पॉवरफुल इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत जाहीर केलेली नाही. SEAT Mo 50 इलेक्ट्रिक स्कूटर 2023 च्या पहिल्या सहामाहीत भारतात लॉन्च केली जाऊ शकते. भारतीय बाजारपेठेत लॉन्च केल्यावर, ई-स्कूटर टीव्हीएस iQube, बजाज चेतक, Ola S1 आणि Ather 450X सारख्यांना स्पर्धा करेल.

दरम्यान, Revamp Moto ने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Buddie 25 लॉन्च केली असून याची प्रारंभिक किंमत 66,999 रुपये आहे. ही स्कूटर एका चार्जवर 70 किमी पर्यंत धावू शकते. याची टॉप स्पीड 25 किमी/तास आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीच्या वेबसाइटवरून फक्त 999 रुपयांमध्ये बुक करू शकतात. कंपनी पुढील वर्षी एप्रिलपासून याची डिलिव्हरी सुरू करू शकते. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Holidays In 2023: पुढील वर्षी तुमच्या सुट्टीच्याच दिवशी येत आहेत 'हे' सण, पाहा संपूर्ण यादी

Car loan Information:

Calculate Car Loan EMI