Upcoming SUV Cars in India : फ्रेंच ऑटोमेकर सिट्रोएन (Citroen) कंपनीनं काही महिन्यांपूर्वी भारतात आपली C3 हॅचबॅक कार लॉन्च केली होती. आता यानंतर कंपनी भारतासाठी आपल्या तीन नवीन कार तयार करत आहे. ज्यामध्ये हॅचबॅक, एक नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही (SUV) आणि आणखी एक नवीन कार समाविष्ट असेल. Citroen ने आपल्या नवीन SUV ची टेस्टिंग देखील सुरू केली आहे.


कसा असेल नवा लूक?


Citroen आपली नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही Stellantis च्या CMP (कॉमन मॉड्युलर प्लॅटफॉर्म) वर तयार करेल. यात 1.2-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन दिलं जाऊ शकतं, जे 130bhp पॉवर जनरेट करेल. यात एलईडी टेल-लाईट्स, ब्लॅक प्लास्टिक क्लॅडिंग, एअर डॅमसह सिग्नेचर ग्रिल, एलईडी डीआरएलसह एलईडी हेडलॅम्प, क्रोम फिनिशसह सिट्रोएनचा सिग्नेचर लोगो, एलईडी लायटिंग सिस्टिम, एलईडी टर्न इंडिकेटर आणि रूफ रेल मिळण्याची शक्यता आहे.


या कारसोबत टक्कर 


नवी कॉम्पॅक्ट SUV Citroen C3 ची पुढची पिढी, नवीन उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह येणारी C3 Aircross असू शकते. ही SUV सुमारे 4.3 मीटर लांब असेल. सध्या या बहुचर्चित कारची टेस्टिंग सुरु आहे. लॉन्च झाल्यानंतर, ही कार भारतातील Skoda Kushaq, Kia Seltos, Hyundai Creta, MG Astor आणि VW Taigun यांच्याशी स्पर्धा करेल.


नवीन इलेक्ट्रिक हॅचबॅक लॉन्च करण्यासाठी Citroen सज्ज 


Citroen एका नवीन इलेक्ट्रिक कारवर देखील काम करत आहे. जी C3 हॅचबॅकचा सामना करेल. या महिन्याच्या अखेरपर्यंत या कारबाबत कंपनीकडून अधिकृत खुलासा केला जाऊ शकतो. ही नवीन कार सीएमपी मॉड्यूलर प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. यामध्ये 50kWh क्षमतेचा बॅटरी पॅक मिळू शकतो. तसेच, यामध्ये वापरलेली इलेक्ट्रिक मोटर 136PS पॉवर आणि 260 Nm टॉर्क निर्माण करू शकते. या कारची रेंज 360 किमीपेक्षा जास्त असू शकते.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI