BYD e6 ELECTRIC MPV : BYD ही चिनी कार उत्पादक कंपनी आहे. या कंपनीने इलेक्ट्रिक कार e6 ELECTRIC MPV भारतात लॉन्च केली आहे. ही एक खाजगी कार आहे, जी सर्वसामान्यांच्या वापरासाठी लाँच करण्यात आली आहे. गेल्या वर्षी, BYD E6 EV केवळ व्यावसायिक कार म्हणून बाजारात आणली गेली होती. या कारचे दोन व्हेरिएंट आहेत ते म्हणजे GL आणि GLX. या कारच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, BYD e6 EV ची सुरुवातीची किंमत 29.15 लाख रुपये आहे. BYD e6 ELECTRIC कारमध्ये आणखी काय खास आहे ते जाणून घ्या.
BYD e6 ELECTRIC MPV पॉवर आणि स्पेसिफिकेशन (Power And Specification) :
कारमध्ये 71.7 kWh ची लिथियम-आयन बॅटरी आहे ज्यामध्ये सिंगल फ्रंट-एक्सल माउंटेड इलेक्ट्रिक मोटर (Electric Motor) आहे जी जास्तीत जास्त 95 PS पॉवर आणि 180Nm चा पीक-टॉर्क जनरेट करेल. तसेच, या कारचा कमाल वेग ताशी 130 किलोमीटर असेल. कंपनीचा दावा आहे की ही कार एका चार्जवर 520 किमी पर्यंत प्रवास करू शकते. जर आपण चार्जिंगबद्दल बोललो तर, या DC फास्ट चार्जिंगसह, ते सुमारे 35 मिनिटांत 30 ते 80% पर्यंत चार्ज होईल आणि 90 मिनिटांत पूर्ण चार्ज होईल. त्याच्या दुसऱ्या व्हेरियंट GLX मध्ये 40 kW वॉल-माउंटेड AC फास्ट चार्जरचा पर्याय देखील आहे परंतु तो चार्ज करण्यासाठी 2 तास लागतील.
BYD e6 कारची वैशिष्ट्ये (BYD e6 ELECTRIC MPV Know Features) :
BYD e6 MUV ही LED DRL, लेदर सीट्स, 6-वे अॅडजस्टेबल ड्रायव्हर आणि फ्रंट पॅसेंजर सीट्स, इन-बिल्ट नेव्हिगेशन, CN95 एअर-ब्लूटूथ आणि 10.1” रोटेटेबल टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम असलेली पाच सीटर कार आहे जी वायफायशी (WiFi) जोडलेली आहे. कारला रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टमची सुविधा देखील मिळते. कंपनी या कारसोबत 8 वर्ष किंवा 50,0000 किलोमीटरची बॅटरी वॉरंटी देत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Mahindra & Mahindra च्या SUV XUV400 EV ची पहिली झलक; आनंद महिंद्रांकडून व्हिडीओ ट्वीट
- प्रतीक्षा संपली! आता 1 सप्टेंबरपासून आपल्या आवडत्या रंगात ऑर्डर करा Ola S1
Car loan Information:
Calculate Car Loan EMI