Hyundai Casper SUV: दक्षिण कोरियाची वाहन उत्पादक कंपनी Hyundai Motor भारतात नवीन सब 4-मीटर SUV लॉन्च करण्याचा विचार करत आहे. या कारचे नाव Ai3 असू शकते. Ai3 SUV चे काही फोटो समोर आले आहेत, ज्यातून कंपनी या कारची टेस्ट करत असल्याची माहिती समोर आली आहे. आज आपण AI3 (Casper) micro SUV बद्दल काही महत्वाची माहिती जाणून घेऊ. कंपनी यात कोणते फीचर्स देऊ शकते, ही कार कधी लॉन्च होणार? याची किंमत किती असू शकते? जाणून घेऊ...
Hyundai Casper SUV: कसा असेल लूक?
दक्षिण कोरियामध्ये विकल्या जाणाऱ्या मॉडेलच्या आधारावर, AI3 मध्ये एक नवीन डिझाइन दिसू शकते. ज्यामध्ये गोलाकार प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि DRLs सह पॅरामेट्रिक फ्रंट ग्रिल मिळेल. यात स्क्वेअर व्हील आर्च आणि 17-इंच अलॉय व्हील देखील मिळू शकतात. मागील प्रोफाइलमध्ये टेल लॅम्पचा अॅडव्हान्स सेट मिळू शकतो. AI3 (Casper) चे डिझाइन बॉक्सी तसेच फंकी आणि युथफूल आहे. याला चारीबाजूनी प्लॅस्टिकचे क्लेडिंग, छतावरील रेल आणि समोर एक स्कफ प्लेट देखील मिळते.
Hyundai Casper SUV: मिळू शकतात हे फीचर्स
AI3 च्या केबिनबद्दल बोलायचे झाले तर यात एक फंकी थीम पाहायला मिळेल. यात नवीन जनरेशन स्टीयरिंग व्हील मिळू शकते. तसेच यात एक मोठा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि 8-इंच टचस्क्रीन, नेव्हिगेशनसह पूर्ण डिजिटल आणि मध्यभागी ब्लू लिंक आहे. यासोबतच ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, सनरूफ, मूड लाइटिंग आणि व्हेंटिलेटेड ड्रायव्हर सीट यासारखे फीचर्सही उपलब्ध आहेत. यासोबतच यामध्ये 301 लीटरची बूट स्पेसही उपलब्ध आहे. यात फरंट कोलिशन अलर्ट, लेन कीप असिस्ट, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन यासह अनेक फीचर्स या कारमध्ये मिळू शकतात.
Hyundai Casper SUV: इंजिन?
या कारच्या ग्लोबल मॉडेलमध्ये 1-लिटर स्मार्टस्ट्रीम पेट्रोल इंजिन आणि 1-लिटर कप्पा, टर्बो पेट्रोल इंजिनचा पर्याय आहे. भारतात 1.2-लीटर कप्पा व्हीटीव्हीटी पेट्रोल इंजिन मिळण्याची अपेक्षा आहे. जे Grand i10 Nios आणि Aura ला देखील मिळते. हे इंजिन 81.8 hp पॉवर आणि 113.8 Nm टॉर्क जनरेट करते. ही कार 20kmpl मायलेज देण्याची अपेक्षा आहे.
या कारशी होणार स्पर्धा
भारतीय बाजारपेठेत या कारची किंमत सुमारे 6 लाख रुपये असू शकते. ही कार भारतात आल्यास टाटा पंच आणि रेनॉ किगर सारख्या कारला टक्कर देऊ शकते. पंच 1.2 लीटर पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे. ज्यामध्ये 20.09 kmpl पर्यंत मायलेज ग्राहकांना मिळतो.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI