Tata Tiago CNG : टाटा मोटर्सच्या टियागो व टिगोरमध्ये प्रगत सीएनजी तंत्रज्ञान लाँच करण्यात आले आहे. अविश्वसनीय कार्यक्षमता, दर्जात्मक सुरक्षितता, प्रभावी वैशिष्ट्यांसह सीएनजी बाजारपेठेत क्रांतिकारी बदल करण्यात आले आहेत. टाटा मोटर्स या भारताच्या अग्रगण्य ऑटोमोबाइल ब्रॅण्डने टियागो व टिगोर यामध्ये प्रगत सीएनजी तंत्रज्ञान लाँच केले आहे.
भारतातील सीएनजी बाजारपेठांशी संलग्न राहत टाटा मोटर्सची नवीन आयसीएनजी श्रेणी टियागो आयसीएनजीसाठी 6,09,900 लाख रूपये, एक्स-शोरूम दिल्ली या सुरूवातीच्या किंमतीत कंपनीच्या अधिकृत सेल्स आऊटलेट्समध्ये उपलब्ध असेल. डिझाइन, परफॉर्मन्स, सेफ्टी व टेक्नोलॉजी अशा अनेक गोष्टींचा विचार करून सीएनजी तंत्रज्ञान लाँच करण्यात आले आहे.
नवीन टियागो आयसीएनजी व टिगोर आयसीएनजीमध्ये रेवोट्रॉन 1.2 लिटर बीएस 6 इंजिनची शक्ती आहे. हे इंजिन 73 पीएसची अधिकतम शक्ती निर्माण करते. ते कोणत्याही सीएनजी कारसाठी सर्वोच्च आहे. आयसीएनजी कार्समध्ये दर्जात्मक तंत्रज्ञान व वैशिष्ट्ये आहेत. तसेच या कार्स पेट्रोल ते सीएनजी व सीएनजी ते पेट्रोल या इंधन मोड्सच्या एकसंधी शिफ्टिंगसाठी उत्तमरित्या प्रोग्राम करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे ग्राहकांना तडजोड न करता सर्वोत्तम ड्रायव्हिंग अनुभव मिळतो.
सीएनजी ग्राहकांना अनेक पर्यायांमधून निवड करण्याची सुविधा देण्याच्या प्रयत्नामध्ये टाटा मोटर्सने टियागो व टिगोरच्या ट्रिम लेव्हल्समध्ये त्यांची आयसीएनजी वाहने लाँच केली आहेत. ग्राहकांना आनंददायी अनुभव मिळण्याच्या खात्रीसाठी दोन्ही कार्समध्ये सर्वोत्तम वैशिष्ट्यांची भर करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या
रोल रॉइस प्रदर्शित करणार जगातली सर्वात महागडी कार, किंमत आणि फीचर्स जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल
Kia Carens : अलिशान किआ कॅरेन्सला तुफान पसंती, पहिल्याच दिवशी 7 हजार 738 बुकिंग्ज
EV Charging Stations : आता घरी किंवा ऑफीसमध्ये चार्जिंग करा इलेक्ट्रिक कार, चार्जिंग स्टेशनसाठीच्या नियमांमध्ये मोठा बदल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Car loan Information:
Calculate Car Loan EMI