Premium SUV: भारतात एसयूव्ही कारची लोकप्रिय खूप वाढत आहे. अनेक लोक एसयूव्ही कार खरेदी करण्यास पसंती दर्शवत आहे. म्हणून वाहन उत्पादक कंपनीही आपल्या नवीन दमदार एसयूव्ही भारतीय बाजारपेठेत लॉन्च करत आहेत. या दिवाळीत तुम्हीही जर नवीन एसयूव्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल,  तर आज आम्ही तुम्हाला भारतात उपलब्ध असलेल्या काही प्रीमियम एसयूव्ही कारबद्दल माहिती सांगणार आहोत. चला तर पाहूया कोणत्या आहेत या प्रीमियम एसयूव्ही...


Hyundai Creta


तुम्ही खरेदी करू शकता अशी सर्वात परिपूर्ण SUV आणि म्हणजेच Hyundai Creta. प्रत्येक बजेट आणि गरजेनुसार विविध गीअरबॉक्स पर्यायांसह डिझेल/पेट्रोल इंजिन पर्यायत सर्वात जास्त विकली जाणारी ही SUV आहे. तुम्ही ही कार खरेदी करणार असाल तर आम्ही याच्या डिझेल इंजिनची शिफारस करतो. यात  DCT टर्बो देखील आहे. 


Maruti Suzuki Grand Vitara hybrid


नवीन ग्रँड विटारा ही सर्वात Efficient SUV आहे. कंपनीने ही कार माईल्ड-हायब्रीड आणि स्ट्रॉंग हायब्रीड प्रकारात लॉन्च केली आहे. ही कार कंपनीची फ्लॅगशिप कार आहे. यात कंपनीने 4-व्हील ड्राइव्ह (4WD) प्रणाली सारख्या आधुनिक फीचर्सचाही पर्याय दिला आहे. सिग्मा, डेल्टा, झेटा, अल्फा, झेटा +, अल्फा + या सहा ट्रिममध्ये कंपनीने ग्रँड विटारा एकूण 11 प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे.


Tata Nexon EV Max


Nexon EV ही सध्या विकत घेण्यासाठी सर्वोत्तम इलेक्ट्रिक कार आहे. चांगल्या रेंजसह किंमतीच्या बाबतीतही ही कार सर्वात लोकप्रिय आहे.  Nexon मध्ये ARAI प्रमाणित 437 किमी रेंजसह 30 नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. या नवीन कारच्या पॉवर आणि स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर, Tata Nexon EV Max मध्ये पॉवरफुल 40.5kWh लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे. या कारमध्ये सध्याच्या Tata Nexon EV पेक्षा 33 टक्के जास्त बॅटरी क्षमता आहे.


Volkswagen Taigun


भारतातील सर्वात सुरक्षित SUV आणि लोकप्रिय 1.0 TSI व्हेरिएंटसह दोन टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन यात देण्यात आले आहे. GNCAP रेटिंग मध्ये ही सर्वात सुरक्षित कार असल्याचे सिद्ध झले आहे. या सर्वात कारमध्ये सर्वात पॉवरफुल इंजिन देण्यात आले आहे.


Jeep Meridian


मेरिडियन ही 7-सीटर SUV आहे. ही जीप ऑफ-रोडींगसाठीही बेस्ट आहे. मेरिडियनने याचे लूक, Quality आणि ऑफ-रोड क्षमतेसह आतील भाग यामुळे आम्हाला प्रभावित केले आहे. ज्यामुळे ही इतर SUV पेक्षा वगेळी आहे. 


Mahindra Scorpio N


स्कॉर्पिओ N ही अधिक प्रिमियम असली तरी स्कॉर्पिओसाठी ओळखले जाणारे हार्डकोर ऑफ-रोड अपील यात कायम राखले आहे. अधिक प्रीमियम इंटिरियर्ससह याचा लूक जबरदस्त आहे. SUV 2.0-लीटर Amstallion टर्बो पेट्रोल आणि 2.2 liter mHawk डिझेल या दोन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. 


 


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI