Vehicle Insurance: रस्त्यावर वाहन चालवताना चालकाकडे काही महत्वाचे दस्तऐवज सोबत असणे, हे आवश्यक आहे. हे दस्तऐवज सोबत नसल्यास चालकाला वाहतूक पोलीस मोठा दंड ठोठावू शकतात. यातीलच एक महत्वाचं दस्तऐवज म्हणजे वाहन विमा. कोणत्याही वाहनाच्या विम्याचे महत्त्व केवळ वाहतूक पोलिसांपासून त्याचे संरक्षण करण्यापुरते मर्यादित नाही. त्यापेक्षा विमा अधिक उपयुक्त आहे. त्याबद्दल योग्य आणि पूर्ण माहिती नसल्यामुळे, लोक अनेकदा त्यांच्या वाहनाचा विमा घेणे किंवा त्याचे नूतनीकरण टाळण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अपघाताच्या वेळी त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. याशिवाय जर तुमच्याकडे विमा नसेल, तर वाहतूक पोलिस तुमच्याकडून दंड घेण्यासोबतच तुमचा DL रद्द करू शकतात. येथे आम्ही विम्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
वाहन नुकसान भरपाई (Vehicle Damage Compensation)
देशात रस्त्यावर होणाऱ्या वाहनांच्या अपघातांची संख्या खूप जास्त आहे. यामुळे जर तुमच्या वाहनच अपघात झाला आणि तुम्ही तुमच्या वाहनाची विमा पॉलिसी घेतली असेल, तर तुमचे नुकसान विम्याद्वारे कव्हर केले जाते. यासाठी तुम्हाला नुकसान भरपाईचा दावा करावा लागेल.
Third Party Insurance
तुम्ही तुमच्या वाहनाचा विमा काढला असेल आणि जर तुमच्या वाहनाचा अपघात झाला, तर विमा कंपनी त्या घटनेत सहभागी असलेल्या इतर व्यक्तीच्या नुकसानीची भरपाई देखील करते. तसेच जर तुम्ही विमा घेतला नसेल तर तुम्हाला नुकसान भरपाई द्यावी लागेल. यासोबतच विमा नसलेले वाहन चालवल्याबद्दल तुम्हाला कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागू शकते.
विम्याचे प्रकार (Types of Insurance)
साधारणपणे दोन प्रकारचे विमा असतात. पहिला सर्वसमावेशक, दुसरा थर्ड पार्टी. सर्वसमावेशक विमा तुमचे वाहन आणि थर्डी पार्टीचे वाहन दोन्ही कव्हर करतो. यामध्ये तुम्ही तुमच्यानुसार काही गोष्टी देखील जोडू शकता. तर थर्ड-पार्टी इन्शुरन्समध्ये, अपघातात सामील असलेल्या इतर व्यक्ती किंवा वाहनाच्या नुकसानीसाठी तुम्हाला भरपाई दिली जाते.
वाहन चोरी झाल्यास काळजी करू नका
देशात आणि राज्य वाहन चोरीच्या अनेक घटना घडत आहेत. तुमच्याकडे वैध वाहन विमा असल्यास आणि अशी घटना तुमच्यासोबत घडल्यास, विमा कंपनीने पॉलिसीमध्ये टाकलेल्या तुमच्या कारची किंमत तुम्हाला दिली जाते. अशाप्रकारे विमा करून तुम्ही सर्व गोष्टींपासून तणावमुक्त राहू शकता.
इतर महत्वाच्या बातम्या:
Car loan Information:
Calculate Car Loan EMI