Upcoming SUV Car: वाहन उत्पादक कंपनी Force Motors ने गेल्या वर्षीच आपल्या गुरखा SUV चे (Force Gurkha) फेसलिफ्ट मॉडेल भारतात लॉन्च केले होते. आता कंपनी लवकरच 5-डोअर मॉडेल लॉन्च करणार आहे. या कारची टेस्ट आधीच सुरू करण्यात आली आहे. ही कार आधीच्या मॉडेलपेक्षा खूपच दमदार दिसत आहे. तसेच हीच लूक ही मस्क्युलर आहे. याच कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.
नवीन 5-डोअर गुरख्याच्या डिझाईनमध्ये ग्राहकांना पुढच्या आणि मागील बंपरसह कंपनीच्या लोगोच्या जागी 'गुरखा' लोगो फ्रंट ग्रिलसह एलईडी हेडलाइट्स आणि टेललाइट्स मिळतील. यात मोठे साइड मिरर, फ्लेर्ड व्हील आणि ऑफ-रोडिंगसाठी बायस्ड टायर्ससह दिसू शकते. याशिवाय इतर कोणतेही बदल या कारमध्ये करण्यात आलेले नाही. या अपडेट मॉडेलचा लूकही सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या मॉडेलसारखाच असण्याची शक्यता आहे. तसेच याची लांबी 4,116 मिमी, रुंदी 1,812 मिमी, उंची 2,075 मिमी आणि याचा व्हीलबेस 2,400 मिमी असू शकतो.
इंजिन
आगामी नवीन गुरखा एसयूव्ही BS6-स्टॅंडर्ड 2.6-लिटर डिझेल इंजिनसह ऑफर केले जाऊ शकते. जे 90 hp पॉवर आणि 260 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल (MT) गिअरबॉक्सशी जोडले जाईल. याशिवाय या एसयूव्हीमध्ये आधुनिक 4X4 व्हील ड्राइव्हची सुविधाही दिली जाऊ शकते.
या नवीन SUV मध्ये ब्लॅक-आउट केबिन दिली जाऊ शकते. ज्यामध्ये राउंड एसी व्हेंट्स, नवीन कॅप्टन सीट्ससह आणखी काही नवीन बदल देखील पाहायला मिळू शकतात. याशिवाय या कारमध्ये अॅपल आणि अँड्रॉइडला सपोर्ट करणारा 7-इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट कन्सोलही दिला जाऊ शकतो. सेफ्टी फीचर्समध्ये या SUV मध्ये ड्युअल एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD), रियर पार्किंग सेन्सर्स, स्पीड अलर्ट सारखे फीचर्स दिले जाऊ शकतात.
संभावित किंमत
सध्याच्या फोर्स गुरखा व्हेरिएंटची किंमत 14.75 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. त्यामुळे आगामी 5-डोर व्हेरियंटची किंमत यापेक्षा थोडी जास्त असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महिंद्रा थार, Isuzu D Max V Cross आणि मारुती ऑफ-रोडिंग व्हेईकल जिम्नीचे आगामी 5-डोअर प्रकार देखील भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेत नवीन गुरखाशी स्पर्धा करण्यासाठी येत आहेत.
दरम्यान, Force Gurkha 5-door SUV ला टक्कर देण्यात मारुतीची जिम्नी आणि महिंद्राची आगामी थारचे नाव आघाडीवर आहे. या दोन्ही कार 5-डोअर प्रकारात देखील सादर केल्या जातील, अशी शक्यता आहे. या गाड्यांच्या फीचर्सध्येही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. आगामी एक्स्पो 2023 मध्ये मारुती सुझुकी जिम्नी आणि महिंद्रा 5-डोअर थार दोन्ही कार सादर केल्या जाऊ शकतात.
इतर महत्वाची बातमी:
Five Door Thar and Jimny: मारुती जिम्नी Vs महिंद्रा थार, कोणती एसयूव्ही आहे बेस्ट?
Car loan Information:
Calculate Car Loan EMI