Best Budget Cars: देशात सध्या सर्वात स्वस्त कारची मोठी मागणी आहे. कारण देशात एक मोठा वर्ग आहे ज्यांना स्वतःसाठी नवीन वाहन घ्यायचे आहे, परंतु त्यांच्याकडे त्यासाठी थोडे कमी बजेट आहे. त्यांच्यासाठी अशी अनेक मॉडेल्स बाजारात उपलब्ध आहेत, जी त्यांच्या बजेटमध्ये बसू शकतात. अशा परिस्थितीत जर तुम्हालाही नवीन कार घ्यायची असेल, परंतु तुमचे बजेट कमी आहे, तर आज आम्ही तुम्हाला अशा काही कारबद्दल सांगणार आहोत, ज्यांची किंमत 5 लाखांपेक्षा कमी आहे. चला तर जाणून घेऊ कोणत्या आहेत या कार्स...


Best Budget Cars: मारुती सुझुकी अल्टो 800 आणि अल्टो K10


मारुती सुझुकी भारतीय बाजारपेठेत अल्टो नावाच्या दोन कार विकते, ज्यात ऑटो 800 आणि अल्टो K10 यांचा समावेश आहे. यामध्ये Alto K10 अधिक पॉवरफुल इंजिन आणि अधिक अपडेटेड फीचर्ससह येतो. अल्टो 800 पेक्षा थोडे महाग आहे. दोन्ही कारमध्ये सीएनजीचा पर्यायही उपलब्ध आहे. Alto 800 ची एक्स-शोरूम किंमत 3.54 लाख रुपये आहे. तर Alto K10 ची एक्स-शोरूम किंमत 3.99 लाख रुपये आहे.


Best Budget Cars: रेनॉल्ट क्विड


ही रेनॉची देशातील एंट्री लेव्हल कार आहे. या कारला दोन पेट्रोल इंजिनांचा पर्याय मिळतो. ज्यामध्ये 0.8 लीटर पेट्रोल आणि 1.0 लीटर पेट्रोल इंजिन समाविष्ट आहे, जे अनुक्रमे 54PS पॉवर आणि 72Nm टॉर्क आणि 68PS पॉवर आणि 91 Nm टॉर्क जनरेट करतात. यात मानक म्हणून 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स, तसेच 1 लिटर इंजिनसह स्वयंचलित ट्रांसमिशन पर्याय मिळतो. यात इलेक्ट्रिक ओआरव्हीएम, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, 8 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, कीलेस एंट्री, ईबीडीसह एबीएस आणि मागील पार्किंग सेन्सर यासारखे फीचर्स आहेत. या कारची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 4.64 लाख रुपये आहे.


Best Budget Cars: मारुती Eeco


ही व्हॅन स्टाईल सर्वात स्वस्त 7-सीटर कार आहे. कारला 1.2 लीटर NA पेट्रोल इंजिन मिळते. जे 73PS पॉवर आणि 98 Nm टॉर्क जनरेट करते. यात सीएनजीचा पर्यायही आहे. याचे इंजिन CNG मोडवर 63PS पॉवर जनरेट करते. ज्यावर त्याला 20km/kg मायलेज मिळते. ही कार 5 आणि 7 सीटर लेआउटमध्ये येते. याची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 4.63 लाख रुपये आहे.


इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातमी: 


Audi Upcoming Cars: ऑडी 2025 पर्यंत 20 नवीन मॉडेल सादर करणार, 10 इलेक्ट्रिक कारचाही समावेश


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI