Audi Upcoming Cars: जर्मन ऑटोमोबाईल कंपनी ऑडीने अलीकडेच वार्षिक मीडिया कॉन्फरन्स आयोजित केली होती. यामध्ये कंपनीने आपल्या मागील वर्षाची आर्थिक माहिती उघड केली आहे. यासोबतच कंपनीने आपल्या भविष्यातील प्लॅनचीही माहिती दिली आहे. ऑडीचे सीईओ मार्कस ड्यूसमन यांनी सांगितले आहे की, 2025 पर्यंत 20 नवीन मॉडेल्स सादर करण्याची कंपनीची योजना आहे. ज्यामध्ये 10 पूर्णपणे इलेक्ट्रिक मॉडेल्सचाही समावेश असेल.


Audi Upcoming Cars: ICE मॉडेल बंद केले जाईल


ऑडीने म्हटले आहे की, ते 2026 पर्यंत आयसीई वाहनांसाठी त्यांचे तंत्रज्ञान विकसित करण्यावर काम करत राहील. यानंतर कंपनी फक्त इलेक्ट्रिक वाहनांवर काम करण्याची योजना आखत आहे. कंपनी 2033 पर्यंत आपल्या ICE कारची विक्री सुरू ठेवेल. कंपनी 2024 मध्ये आपली नेक्स जनरेशन A4 आणि A6 लक्झरी सेडान देखील आणणार आहे. ज्यामध्ये इंजिनचे अपडेट्स दिसतील.


Audi Upcoming Cars: Audi Q6 e-tron लवकरच लॉन्च


कंपनी लवकरच आपल्या 10 नवीन EV चे पहिले मॉडेल Audi Q6 e-tron लॉन्च करू शकते. ऑडी Q6 ई-ट्रॉन कंपनीच्या लाइनअपमध्ये Q4 ई-ट्रॉन आणि Q8 ई-ट्रॉन इलेक्ट्रिक SUV मध्ये स्थित असेल. हे एसयूव्ही आणि स्पोर्टबॅक या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध केले जाईल. Q6 ई-ट्रॉन ही प्रीमियम प्लॅटफॉर्म इलेक्ट्रिक (PPE) वर तयार केलेली पहिली कार असेल.


Audi Upcoming Cars: पॉवरट्रेन कशी असेल?


ऑडी युरोपमध्ये त्याच्या Q6 ई-ट्रॉन प्रोटोटाइपसाठी उत्पादन युनिट स्थापन करत आहे. कंपनीने माहिती दिली आहे की, ही इलेक्ट्रिक एसयूव्ही 800-व्होल्ट इलेक्ट्रिकल सिस्टमने सुसज्ज असेल सध्या बहुतेक कार कंपन्या त्यांच्या कारमध्ये 400-व्होल्ट सिस्टम वापरतात. नवीन तंत्रज्ञानामुळे बॅटरी चार्जिंगचा वेळ निम्म्याने कमी होईल. Q6 e-tron बद्दल अधिक तपशील पुढील काही महिन्यांत उघड होऊ शकतात. ही कार 2023 च्या उत्तरार्धात किंवा 2024 च्या सुरुवातीला लॉन्च केली जाऊ शकते.


BMW iX3 शी करेल स्पर्धा 


Q6 ई-ट्रॉन कार BMW ix3 शी स्पर्धा करेल. जी 281 bhp पॉवर निर्माण करते आणि प्रति चार्ज 460 किमी इतकी आहे.


मारुती घेऊन येत आहे 3 जबरदस्त कार


मारुती सुझुकी येत्या काही महिन्यांत भारतीय बाजारपेठेत तीन नवीन कार आणण्याच्या तयारीत आहे. ज्यामध्ये पहिले मॉडेल Brezza SUV चे CNG व्हर्जन असेल. यानंतर कंपनी मे-जून 2023 पर्यंत फ्रँक्स क्रॉसओवर आणि जिम्नी लाईफस्टाईल SUV लॉन्च करू शकते करेल. 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI