Tata Tiago CNG : भारतातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने (Tata Motors) त्यांच्या आगामी सीएनजी कार्स लवकरच बाजारात आणण्याबाबत माहिती दिली आहे. टाटा टिगोर (Tata Tigor) आणि टियागो (Tata Tiago) या दोन सीएनजी इंजिन असणाऱ्या कार्स टाटा कंपनी लवकरच सादर करणार आहे. टाटा कंपनी त्यांच्या या कारमध्य़े कंपनी फिटेड सीएनजीची सोय करुन देणार आहे.
एकीकडे सीएनजीचे भाव वाढत असले तरी या आगामी टियागो कारमध्ये सोय असणाऱ्या सीएनजीच्या मदतीने कार चालकाला अवघ्या 2 रुपयांच्या किंमतीत एक किलोमीटरचा प्रवास करता येईल, असा दावा टाटा कंपनीने केला आहे. त्यामुळे पेट्रोल कारच्या तुलनेत ही कार ग्राहकांना फार अधिक परवडणार आहे.
सीएनजी कार लोकप्रिय
सध्या वाढत्या पेट्रोल किंमतींमुळे आधीच सामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. त्यात इलेक्ट्रिक कार्सनाही पूर्णपणे वापरात येण्याकरता अजून वेळ असल्याने तोवर सीएनजी हाच व्हेरियंट सर्वात परवडणारा आहे. त्यात सीएनजी भरण्यासाठी पंपावर बरीच प्रतिक्षा करावी लागत असली तसंच सीएनजी पंपही अधिक प्रमाणात नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. पण यानंतरही खिशाला परवडत असल्याने सीएनजी कार्स अधिक लोकप्रिय आहेत. टाटा कंपनीच्या अल्ट्रॉजमध्येही लवकरच सीएनजीची सोय देणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे.
हे ही वाचा-
- टाटाने मारली बाजी, ह्युंदाईला मागे टाकत टाटा मोटार्स भारतातील दुसरी मोठी कार कंपनी
- Car Technologies : ग्राहकांच्या पसंतीस उतरतील अशा कारच्या जबरदस्त 3 टेक्नॉलॉजी, जाणून घ्या नवे फिचर्स
- Hyundai Tucson भारतात लॉन्च होण्यास सज्ज, 10.25 इंच स्क्रीनसह शक्तिशाली इंजिन
- Tata Punch ला टक्कर देणार Maruti Suzuki Swift मायक्रो SUV, लवकरच बाजारात दाखल होणार
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live
Car loan Information:
Calculate Car Loan EMI