Car Technologies : गेल्या काही वर्षांमध्ये टेक्नॉलॉजीच्या बाबतीत वाहन क्षेत्राने चांगली प्रगती केली आहे. नव्य-नव्या टेक्नॉलॉजीचा वापर करून तयार करण्यात आलेल्या अनेक कार (Car) आज बाजारात उपलब्ध आहेत. ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी या टेक्नॉलॉजीचा कंपन्यांना चांगलाच फायदा होत आहे. कार कंपन्या ग्राहकांच्या पसंतीस पडतील अशा कार बाजारात आणत आहेत. शिवाय बदलत्या टेक्नॉलॉजीचा त्यामध्ये वापर करून ग्राहकांना जास्तीत जास्त त्याचा फायदा होईल याकडे कंपन्या जास्त लक्ष देत आहेत. अशाच जबरदस्त 3 टेक्नॉलॉजींबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यामध्ये ड्रायव्हरलेस कार फिचरचाही समावेश आहे. अनेक कंपन्यांनी ड्रायव्हरलेस कार टेक्नॉलॉजी विकसीत केली आहेत. 


ड्रायव्हरलेस कार
वाहन बनविण्याच्या कंपनींमध्ये अग्रेसर असलेली टेस्ला कंपनीचे तर आपण नाव एकलेच असेल. टेस्ला कंपनीच्या कार ड्रायव्हरलेस कार फिचरमुळे चांगल्याच चर्चेत असतात. कंपनीने विकसीत केल्या ड्रायव्हरलेस कार फिचरच्या कार रस्त्यावर उतवण्यासाठी अनेक देश विचारात असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये या कार बाजारातही येतील. 


बायोमेट्रीक एक्सेस
नव्या टेक्नॉलॉजीनुसार कारमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरची सुविधाही देण्यात आली आहे. आतापर्यंत तुम्ही कार्यालय किंवा स्मार्ट फोन आणि लॅपटॉपमध्येच फिंगरप्रिंटचा वापर होत असलेला पाहिला असेल. परंतु आता हिच टेक्नॉलॉजीजी तुमच्या कारमध्येही पाहता येणार आहे. 


मॉनिटरिंग आणि रिमोट शटडाउन
नव्या कारसाठी त्यांच्या मॉनिटरिंग आणि रिमोट शटडाउनचे फिचरही उपलब्ध आहेत. त्यामुळे कारची सुरक्षा वाढते. यासोबतच योग्य वेळी कारची कंडिशनही समजते. या रिमोट शटडाउनचा उपयोग तुम्ही इतर कारचे इंजिन बंद करण्यासाठीही करू शकता.   

नव-नव्या टेक्नॉलॉंमुळे कार क्षेत्राने ग्राहकांच्या पसंतीस पडतील अशा कार निर्मितीला प्राधान्य दिले आहे. स्पर्धेच्या युगात इतर कंपनीपेक्षा आपली कार ग्राहकांना जास्त आवडेल यासाठी कंपन्या सतत टेक्नॉलॉजीमध्ये बलद करत असताता. त्यामुळे बदलत्या काळात टेक्नॉलॉजीला अलिकडे जास्त महत्व आले आहे. 
महत्वाच्या बातम्या



 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI