Royal Enfield Scram 411: बुलेट मोटरसायकल क्षेत्रातील दिग्गज रॉयल एनफिल्डची नवीन बाईक Royal Enfield Scram 411 चाचणी दरम्यान रस्त्यावर पाहायला मिळाली. रोड टेस्टिंग दरम्यानचा बाईकचा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल होतोय. रॉयल एनफील्ड कंपनीची 2022 मध्ये लॉन्च होणारी ही पहिली बाईक असू शकते. कंपनी पुढील वर्षी भारतात अनेक मोटारसायकल्स लाँच करणार आहे. मद्रासमध्ये कंपनीने प्रत्येक तिमाहीत एक नवीन बाईक लॉन्च करण्याची योजना आखली आहे.
फिचर्स काय?
Royal Enfield Scrum 411 बाईक हिमालयन सीरीज आधारित अॅडव्हेंचर मोटरसायकल असू शकते. ही मोटरसायकल नुकतीच दक्षिण भारतात रोड टेस्टिंग दरम्यान दिसली. नवीन Royal Enfield Scream 411 बाईक दोन रंगांच्या (लाल आणि काळा) कॉम्बिनेशनसह लॉन्च केली जाईल. याशिवाय, इतर काही महत्त्वपूर्ण बदल देखील केले गेले आहेत, ज्यात ब्रश केलेले अॅल्युमिनियम इन्सर्टसह नवीन हेडलॅम्प काउल, नवीन ग्रॅब रेल आणि एक लहान व्हिझर यांचा समावेश आहे.
इंजिन
पॉवरट्रेनही काही किरकोळ बदलांसह हिमालयन सीरीजसारखेच इंजिन यात अपेक्षित आहे. रॉयल एनफिल्ड हिमालयन सध्या BS6 अनुरूप 411cc, सिंगल-सिलेंडर, 4-स्ट्रोक, SOHC, एअर-कूल्ड, इंधन-इंजेक्टेड इंजिनद्वारे संचालित आहे. ही मोटर 6,500 rpm वर 24.4 hp ची कमाल पॉवर आणि 4000-4500 rpm दरम्यान 32 Nm पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन 5-स्पीड कॉन्स्टंट मेश मॅन्युअल गिअर बॉक्सशी जोडलेले आहे.
हार्डवेअर आणि किंमत
हार्डवेअरच्या बाबतीत सांगायचे झालं तर आगामी Royal Enfield Scrum 411 मध्ये समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूस मोनो-शॉक एब्जॉर्बर मिळेल. त्याचप्रमाणे याला दोन्ही टोकांना डिस्क ब्रेकसह ड्युअल-चॅनल ABS मिळेल. नवीन Royal Enfield Scrum 411 पुढील वर्षाच्या सुरुवातीला सुमारे 1.90 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीसह लॉन्च केले जाऊ शकतात.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
- Royal Enfield ची नवी बाईक लवकरच बाजारात, प्रसिद्ध हिमालयन मॉडेलचं स्वस्त Version
- Electric Scooter: Okaya Faast इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, किंमत घ्या जाणून
- TVS पासून तर Suzuki Hayabusa पर्यंत, 2021 मध्ये लॉन्च झाल्या या धमाकेदार बाईक्स
Car loan Information:
Calculate Car Loan EMI