Suzuki Working On Swift Cross Micro SUV : मारुती सुझुकीनं या महिन्यात भारतात आपली नव्या जनरेशनमधील सेलेरियो कार लॉन्च केली आहे. याव्यतिरिक्त कंपनी लवकरच स्विफ्ट, बलेनो, ब्रिझा आणि एस-क्रॉस यांसारख्या आपल्या लोकप्रिय कार्स पुन्हा एकदा नव्यानं लॉन्च करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी भविष्यात मायक्रो एसयूव्ही सेगमेंटमध्येही एन्ट्री घेऊ शकते. 


जपानी वेबसाईट 'Bestcarweb' नं दिलेल्या माहितीनुसार, सध्या सुझुकी एका मायक्रो एसयूव्हीवर काम करत आहे. ज्याची नवी पिढी सुझुकी स्विफ्ट हॅचबॅकवर आधारीत असण्याची शक्यता आहे. हे नवं मॉडेल सुझुकी स्विफ्ट क्रॉस (Suzuki Swift Cross) नावानं लॉन्च केलं जाऊ शकतं. दरम्यान, यासाठी आणखी अवधी लागणार आहे. हे जागतिक पातळीवर 2024 च्या शेवटापर्यंत सादर करण्याची शक्यता आहे. 


टाटा पंचला टक्कर देणार सुझुकी स्विफ्ट क्रॉस!


मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुझुकी स्विफ्ट क्रॉस (Suzuki Swift Cross) ची टाटा पंच (Tata Punch) सारख्या गाड्यांशी स्पर्धा असेल. टाटा पंच गेल्याच महिन्यात भारतात लॉन्च करण्यात आली आहे. दरम्यान, मारुती सुझुकीकडे या सेगमेंटमध्ये याआधीपासूनच इग्निस (Ignis) कार आहे. याव्यतिरिक्त कंपनी  Suzuki Swift Cross भारतात टाटा पंचला टक्कर देण्यासाठी आणू शकते. 


सुझुकीचा लेटेस्ट हार्टेक्ट प्लेटफॉर्म आगामी स्विफ्ट क्रॉसमध्ये पाहायला मिळू शकतो. कारमध्ये टर्बोचार्ज्ड 1.4-लिटर इंजिन मिळू शकतो. जे नव्या पिढीच्या स्विफ्ट हॅचबॅकमध्ये आहे. हे इंजिन अधिकतम 129 bhp ची पावर आणि 235 Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यासाठी सक्षम आहे. 


इतर रिपोर्ट्स काय म्हणतात?


काही रिपोर्ट्सनुसार, वह इग्निस आणि सबकॉम्पॅक्ट एसयूवी विटारा ब्रिजा यांच्यासोबतच स्विफ्ट क्रॉस तयार करण्यामागे  ग्राहकांना कंपनी आणखी एक पर्याय उपलब्ध करुन देण्याची सुझुकीची योजना आहे. तसेच इतर अनेक रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, सुझुकी वैश्विक बाजारांमध्ये उपलब्ध टोयोटा यारिस क्रॉसला स्विफ्ट क्रॉसच्या रुपात रिबॅज करु शकतात. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा



Car loan Information:

Calculate Car Loan EMI