Tata Motors Commercial Vehicles: देशातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्सच्या (Tata Motors) बाबतीत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. टाटा मोटार्सने आपल्या ग्राहकांना धक्का दिला आहे. कंपनीने आपल्या वाहनांच्या किंमतीत वाढ (Vehicles Price) करण्याची घोषणा केली आहे. टाटा मोटार्सने वाहनांच्या किंमतीत 2 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळं कंपनीला हा निर्णय घ्यावा लागल्याची माहिती मिळाली आहे.
टाटा मोटार्सने आपल्या वाहनांच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. टाटा मोटर्सची वाहनांच्या किंमतीत जवळपास 2 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन दर हे 1 जुलैपासून लागू होणार आहेत. टाटा मोटर्सने बुधवारी याबाबतची माहिती दिली. वस्तूंच्या किंमतीत वाढ झाल्यामुळं आपल्या वाहनांचे दर वाढवावे लागले आहेत. दरम्यान, कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही वाढ सर्व प्रकारांवर वेगळी असणार आहे.
2024 मध्ये टाटा मोटर्सचा महसूल 52.44 बिलियन डॉलर
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी सध्या नवीन उत्पादने लॉन्च करण्याच्या तयारीत व्यस्त आहे. भारत, ब्रिटन, अमेरिका, इटली आणि दक्षिण कोरियामधील जनरल नेक्स्ट ग्राहकांच्या गरजेनुसार ही वाहने तयार केली जात आहेत. ही सर्व वाहने आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असतील. महसुलाच्या बाबतीत देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने मार्चमध्ये आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किंमती 2 टक्क्यांनी वाढवल्या होत्या. आर्थिक वर्ष 2024 मध्ये टाटा मोटर्सचा महसूल 52.44 बिलियन डॉलर झाला आहे.
टाटा मोटर्सच्या गुंतवणुकदारांना चांगला परतावा
दरम्यान, टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये देखील चांगली वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. यावर्षी टाटा मोटार्सच्या शेअरने गुंतवणुकदारांना 26 टक्के परतावा दिला आहे. यावर्षी टाटा मोटर्सचा स्टॉक चांगली कामगिरी करत आहे. सुमारे 26.6 टक्के वाढ झाली आहे. बुधवारी दुपारी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर कंपनीचे शेअर्स सुमारे 2.40 रुपयांनी (0.24 टक्के) खाली गेले होते. टाटा मोटर्सचा शेअर 983 रुपयांच्या आसपास व्यवहार करत होता. त्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत होती. या वर्षी त्याने 1000 रुपयांचा टप्पा अनेक वेळा ओलांडला आहे.
फ्रीलँडर नवीन शैलीत लॉन्च करण्याचा निर्णय
टाटा मोटर्सच्या मालकीच्या जग्वार आणि लँड रोव्हरने त्यांची लोकप्रिय कार फ्रीलँडर नवीन शैलीत लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी चीनच्या चेरी ऑटोमोबाईलसोबत करार केला आहे. फ्रीलँडर आता इलेक्ट्रिकमध्ये सुरु करण्याचा निर्णय घेम्यात आला आहे. फ्रीलँडर जवळपास एक दशकापूर्वी बंद करण्यात आली होती
महत्वाच्या बातम्या:
बजेटमध्ये स्वप्नातील कार, स्वस्तात घ्या मस्त 'राइड'; 8 लाख रुपयांच्या आतील 'टॉप 5' SUV
Car loan Information:
Calculate Car Loan EMI