Father's Day 2024 : फादर्स डे दोन दिवसांवर आलाय. तुमच्‍या जीवनातील मार्गदर्शक असलेल्‍या वडिलांना सन्‍मानित करण्‍यासाठी ही योग्‍य वेळ आहे. नेहमीचे टाय किंवा इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्‍तू देण्‍याऐवजी तुम्ही इलेक्ट्रिक स्‍कूटर गिफ्ट देऊ शकता. अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाची प्रशंसा करणाऱ्या वडिलांसाठी इलोक्ट्रिक स्कूटर  योग्‍य गिफ्ट ठरू शकते. इलेक्ट्रिक स्‍कूटर्स पर्यावरणदृष्‍ट्या लाभदायी असण्‍यासोबत परवडणाऱ्या आणि वापरण्‍यास सोप्‍या आहेत, ज्‍यामुळे सर्वच जीवनशैलीच्‍या पालकांसाठी सर्वोत्तम पर्याय आहेत. १.५ लाख रूपयांपेक्षा कमी किंमत असलेल्‍या अव्‍वल पाच सर्वोत्तम इलेक्ट्रिक स्‍कूटर्स खाली दिल्‍या आहेत, ज्‍या अद्वितीय व विचारशील फादर्स डे गिफ्ट ठरतील. 

  
१. ओडीसी हॉक एलआय 


किंमत: १,१७,९५० रूपये  (एक्‍स-शोरूम किंमत) 


ओडीसी हॉक प्‍लस हाय स्‍पीड स्‍कूटर आहे. या स्‍कूटरमध्‍ये १८०० वॅट मोटरसह १९०० वॅट सर्वोच्‍च शक्‍ती आहे. ही मोटर ७२ व्‍होल्‍टसह ऑपरेट होते आणि ४४ एनएमचा टॉर्क देते. स्‍कूटर कीलेस व इलेक्ट्रिक सिस्‍टमसह सुरू होते आणि फ्रण्‍ट-ड्राइव्‍ह ट्रान्‍समिशनसह प्रतितास ७० किमीची अधिकतम गती प्राप्‍त करते. या स्‍कूटरचे आकारमान १९०० x ७३० x ११३० मिमी आहे, व्‍हीलबेस १३८० मिमी आणि सीट उंची ८३० मिमी आहे. हॉकचे एकूण वजन १२८ किग्रॅ आहे, तसेच स्‍कूटरमध्‍ये अलॉई व्‍हील रिम्‍स आणि १५० किग्रॅची लोडिंग क्षमता आहे. या स्‍कूटरमध्‍ये २.८८ केडब्‍ल्‍यू लि-आयन बॅटरी आहे, जी ४ तासांमध्‍ये संपूर्ण चार्ज होते. स्‍कूटरमध्‍ये ट्यूबलेस टायर्स आहेत (पुढील बाजूस १००/८० - १२ आणि मागील बाजूस १२०/७० - १२) आणि टेलिस्‍कोपिक फ्रण्‍ट सस्‍पेंशन आहे, तसेच सुलभ राइडसाठी दोन्ही बाजूस स्प्रिंग-लोडेड हायड्रॉलिक रिअर सस्‍पेंशन आहे.  ही इलेक्ट्रिक स्‍कूटर चारकोल ब्‍लॅक, ग्रॅव्हिटी ग्रे, इंटेन्‍स रेड, मिरेज व्‍हाइट, ट्रान्‍स मॅट ब्‍ल्‍यू अशा आकर्षक रंगांमध्‍ये उपलब्‍ध आहे. 


२. ओडीसी ई२गो प्‍लस 


किंमत: ८१,४०० रूपये 


ओडीसी ई२गो प्लस लो स्‍पीड स्‍कूटर आहे, ज्‍यामध्‍ये कार्यक्षमता व किफायतशीरपणाचे संतुलन आहे. ज्‍यामुळे खिशावर अधिक भार न देता तुमचे वडिल प्रत्‍येक राइडचा आनंद घेण्‍याची खात्री मिळू शकते. या स्‍कूटरमध्‍ये २५० वॅट मोटरची शक्‍ती आणि ६० व्‍होल्‍ट बॅटरी आहे, तसेच २९ एएचची काहीशी कमी क्षमता आहे. ही स्‍कूटर ४ तासांमध्‍ये संपूर्ण चार्ज होते आणि अधिकतम स्‍पीड प्रतितास २५ किमी आहे. ई२गो प्‍लसमध्‍ये पीआरओ मॉडेलप्रमाणे तेच सस्‍पेंशन आणि ब्रेकिंग सिस्‍टम्‍स आहेत, ज्‍यामधून आरामदायी व सुरक्षित राइडची खात्री मिळते. आकर्षक डिझाइन व कीलेस स्‍टार्टसह ही स्‍कूटर स्‍टायलिश आणि वापरण्‍यास सोपी आहे, ज्‍यामुळे तुमच्‍या वडिलांसाठी परिपूर्ण गिफ्ट आहे. 


३. ओला एस१ एक्‍स 


किंमत: ७८,८०३ रूपये ते १.०४ लाख रूपये 


ओला एस१ एक्‍स लो स्‍पीड स्‍कूटर, तसेच शक्तिशाली व स्‍टायलिश इलेक्ट्रिक स्‍कूटर आहे, जी सर्वोत्तम कार्यक्षमता व रेंज देते. या स्‍कूटरमध्‍ये ८.४ केडब्‍ल्‍यू मोटर आणि लिथियम-आयन बॅटरी आहे, जी ७ तास व २० मिनिटांमध्‍ये संपूर्ण चार्ज होते. एस१ एक्‍स प्रतितास ८५ ते ९० किमी टॉप स्‍पीडपर्यंत पोहोचू शकते आणि संपूर्ण चार्ज असल्‍यास १५१ ते १९१ किमीची प्रभावी रेंज देते. या स्‍कूटरमध्‍ये पुढील व मागील बाजूस ड्रम ब्रेक्‍स आहेत, ज्‍यामधून रस्‍त्‍यावर सुरक्षिततेची खात्री मिळते. ओला एस१ एक्‍सची प्रभावी रेंज आणि टॉप स्‍पीड लहान व लांबच्‍या प्रवासासाठी या स्‍कूटरला अनुकूल बनवतात, ज्‍यामुळे तुमच्‍या वडिलांसाठी परिवहनाचे वैविध्‍यपूर्ण व विश्‍वसनीय माध्‍यम मिळते. 


४. कायनेटिक ग्रीन ई लुना 


किंमत: ७७,५८३ रूपये ते ८८,६६८ रूपये 


आयकॉनिक लुनामध्‍ये सुधारणा करत कायनेटिक ग्रीन ई लुनामध्‍ये सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांसह आधुनिक इलेक्ट्रिक तंत्रज्ञान समाविष्‍ट आहे. या स्‍कूटरमध्‍ये १.२ केडब्‍ल्‍यू मोटर आहे आणि १.७ केडब्‍ल्‍यूएच व २ केडब्‍ल्‍यूएच बॅटरी क्षमतांसह दोन व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये येते. ही स्‍कूटर ८० ते ११० किमीची रेंज देते आणि जवळपास ४ तासांमध्‍ये संपूर्ण चार्ज होते. प्रतितास ५० किमीच्‍या टॉप स्‍पीडसह ई लुना शहरातील प्रवासासाठी अनुकूल आहे. या स्‍कूटरमध्‍ये सुधारित सुरक्षिततेसाठी ड्रम ब्रेक सिस्‍टमसह कम्‍बाइन्‍ड ब्रेकिंग सिस्‍टम (सीबीएस) आहे. ई लुनाचे डिजिटल इन्‍स्‍ट्रूमेंट क्‍लस्‍टर आणि यूएसबी चार्जिंग सॉकेट तिच्‍या क्‍लासिक डिझाइनमध्‍ये आधुनिकतेची भर करतात, ज्‍यामुळे तुमच्‍या वडिलांसाठी विचारशील व कार्यक्षम गिफ्ट आहे.   


५. अॅम्पियर मॅग्‍नस ईएक्‍स 


किंमत: ९९,०६० रूपये 


अॅम्पियर मॅग्‍नस ईएक्‍समध्‍ये शक्‍ती व व्‍यावहारिकतेचे संयोजन आहे, ज्‍यामुळे दैनंदिन वापरासाठी ही सर्वोत्तम पर्याय आहे. या स्‍कूटरमध्‍ये १,२०० वॅट मोटर आणि ६० व्‍होल्‍ट/२८ एएच बॅटरी आहे, तसेच ५ ते ६ तासांमध्‍ये संपूर्ण चार्ज होते. मॅग्‍नस ईएक्‍स फक्‍त १० सेकंदांमध्‍ये ० ते ५५ किमी/तास गती प्राप्‍त करू शकते आणि टॉप स्‍पीड ५५ किमी/तास असण्‍यासह प्रतिचार्ज ८४ किमी रेंज देते. या स्‍कूटरच्‍या दोन्‍ही व्‍हील्‍समध्‍ये कम्‍बाइन्‍ड ब्रेकिंग सिस्‍टमसह ड्रम ब्रेक्‍स आहेत, ज्‍यामुळे सुरक्षित स्‍टॉपिंग पॉवरची खात्री मिळते. सोईस्‍कर वैशिष्‍ट्ये आहेत कीलेस एण्‍ट्री, डिटॅचेबल बॅटरी, डिजिटल डॅशबोर्ड, यूएसबी चार्जर आणि अंडर-सीट एलईडी लाइट. ही वैशिष्‍ट्ये स्‍कूटरची व्‍यावहारिकता आणि सुलभ वापरामध्‍ये अधिक वाढ करतात, ज्‍यामुळे तुमच्‍या वडिलांसाठी योग्‍य गिफ्ट आहे.  


या इलेक्ट्रिक स्‍कूटर्स विविध गरजा व प्राधान्‍यक्रमांनुसार अनेक वैशिष्‍ट्यांनी युक्‍त आहेत, ज्‍यामुळे फादर्स डेसाठी योग्‍य गिफ्ट्स आहेत. तुमचे वडिल गती, रेंज किंवा नॉस्‍टेल्जिक डिझाइनला महत्त्व देत असतील तर त्‍यांच्‍यासाठी या यादीमध्‍ये परिपूर्ण स्कूटर आहे.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI