India Suv Cars: भारतातील ग्राहकांची SUV वाहने खरेदी करण्याची क्रेझ सातत्याने वाढताना दिसत आहे. यामुळेच कदाचित गेल्या पाच वर्षांत 36 SUV मॉडेल भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यात आल्या आहेत. SUV ची 'क्रेझ' इतकी आहे की, काही लोकप्रिय मॉडेल्स विकत घेण्यासाठी लोकांना दोन वर्षे वाट पहावी लागत आहे. मात्र त्यानंतरही ऑर्डरचा वर्षाव होत आहे. कार खरेदीदार वाहनांवर अधिक खर्च करण्यास तयार आहेत. सनरूफ आणि नवीनतम तंत्रज्ञानासारखी फीचर्स असलेल्या वाहनांच्या स्टॅंडर्ड मॉडेलला प्राधान्य देत आहेत.


एसयूव्ही अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत


ज्या बाजारात हॅचबॅकची विक्री सर्वात जास्त असायची, तिथे एंट्री-लेव्हल आणि मिड-साईज स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल्स (SUV) अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. यामुळेच या श्रेणीतील नवीन मॉडेल बाजारात आणले जात आहेत.


वाहन क्षेत्रात SUV चा वाटा 40 टक्के 
     
मारुती सुझुकी इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संचालक (विक्री विपणन) शशांक श्रीवास्तव म्हणाले की, “एसयूव्ही श्रेणीमध्ये गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढ झाली आहे. वाहन क्षेत्रात SUV श्रेणीचे योगदान जे पूर्वी सुमारे 19 टक्के होते, ते 2021-22 मध्ये 40 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.''


प्रीमियम हॅचबॅकला मागे टाकते


मागणी वाढल्याने एंट्री-लेव्हल एसयूव्ही श्रेणीने गेल्या आर्थिक वर्षात देशांतर्गत प्रवासी वाहनांच्या बाजारपेठेत सर्वात मोठा वाटा उचलला आहे. तसेच 2011 पासून बाजारपेठेत राज्य करत असलेल्या प्रीमियम हॅचबॅकला मागे टाकले.


महत्वाच्या बातम्या : 



 


 


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI