Maruti Suzuki Grand Vitara : दीर्घ काळाच्या प्रतीक्षेनंतर आता मारूती सुझुकी लवकरच आपली मध्यम आकाराची SUV Grand Vitara लॉन्च करणार आहे. काही दिवसांपूर्वीच या कारचा दमदार टीझर लॉन्च करण्यात आला होता. मारुती आणि टोयोटा यांच्या भागीदारीखाली तयार करण्यात आलेल्या या कारला देशात उपलब्ध Kia Seltos, Hyundai Creta, Volkswagen Taigun, MG Astor, Nissan Kicks, Skoda Kushaq यांसारख्या गाड्यांना कडवी टक्कर द्यावी लागणार आहे.
ग्रँड विटारा (Grand Vitara) देशातील बाजारपेठेत कंपनीच्या उपलब्ध एस-क्रॉस ची जागा घेईल. मारुतीने 2015 मध्ये एस-क्रॉस लाँच केले होते, परंतु आता कंपनीने भारतात एस-क्रॉसचे उत्पादन थांबवले आहे, त्यानंतर आता ग्रँड विटारा बाजारात त्याची जागा घेणार आहे. कंपनीने या कारसाठी बुकिंगही सुरू केले आहे.
Nexa डीलरशिपद्वारे होणार विक्री :
ग्रॅंड विटारा ही मारुतीच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात प्रगत आणि एडव्हान्स कार असणार आहे. ही कार जी ग्लोबल सी प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. या कारला 1.5 लीटर K15C फोर सिलेंडर ड्युअलजेट माईल्ड हायब्रिड पेट्रोल इंजिन मिळेल. मारुतीने एस-क्रॉसची विक्री नेक्सामार्फतच केली. 2017 मध्ये, एस क्रॉसचे फेसलिफ्ट मॉडेल देखील लाँच करण्यात आले, ज्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पण आता त्याच्या सेगमेंटमध्ये नवीन गाड्या आल्याने त्याची विक्री लक्षणीयरीत्या कमी झाली आहे, त्यामुळे आता त्याचे उत्पादन थांबविण्यात आले आहे. या कारप्रमाणेच नवीन विटाराही नेक्सा डीलरशिपद्वारे विकली जाईल.
क्रेटाशी स्पर्धा :
ग्रँड विटाराचे उत्पादन ऑगस्टमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. या नवीन ग्रॅंड विटारा कारच्या लॉन्चसह कंपनीला जागतिक बाजारपेठेतील मध्यम आकाराच्या SUV सेगमेंटमध्ये आपला हिस्सा वाढवायचा आहे. 4.3 मीटर लांबीची मारुती विटारा ह्युंदाई क्रेटाशी स्पर्धा करेल. Kia Seltos आणि Toyota Urban Cruiser HyRyder हे सुद्धा त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Tesla ला देणार टशन, Hyundai ची पहिली इलेक्ट्रिक कार Ioniq6 लॉन्च
- Nissan ने लॉन्च केली आपली नवीन SUV, आकर्षक लूकसह मिळणार हे फीचर्स
- मिनी कार, पण दमदार! Tata Tiago वर मिळत आहे मोठी सूट
Car loan Information:
Calculate Car Loan EMI