Tata Tiago Discount Offers: देशातील प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी Tata Motors ने या महिन्यात आपल्या सर्वात स्वस्त कार असलेल्या Tata Tiago वरमोठी सूट जाहीर केली आहे. कंपनी आपल्या या कारणावर 23 हजार रुपयांपर्यंत सवलत देत आहे. असं असलं तरी टाटाने काही दिवसांपूर्वी या कारच्या किंमतीत वाढ केली होती. किंमती वाढल्यानंतर आता या कारच्या बेस व्हेरिएंटची किंमत 5.39 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) ठेवण्यात आली आहे. Tata Tiago वर कंपनी काय ऑफर देत आहे, हे आपण जाणून घेणार आहोत.


Tata Tiago वर काय आहे ऑफर?


कंपनी Tata Tiago च्या XE, XM आणि XT प्रकारांवर एकूण 13,000 रुपयांची सवलत आणि 10,000 चे एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपये कॉर्पोरेट बोनस देत आहे. XZ आणि इतर प्रकारांवर कंपनी एकूण 23,000 रुपयांची सवलत देत आहे. ज्यामध्ये 10,000 रुपयांची रोख सूट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांचा कॉर्पोरेट बोनस आहे.


टियागो महागली 


टाटा मोटर्सने गेल्या 60 दिवसांत टाटा टियागोच्या किमती दोन वेळा वाढवल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच याची किंमत 2 हजारांनी वाढवली होती. त्यानंतर आता नवीन किंमत (बेस व्हेरिएंटसाठी) 5.37 ऐवजी 5.39 लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) झाली आहे. तसेच आता याचा टॉप एंड व्हेरिएंट 7.79 लाख रुपयांऐवजी 7.81 लाख रुपयांमध्ये उपलब्ध असेल. याआधीही या मॉडेलच्या किमती 15 हजारांवरून 46000 हजारपर्यंत वाढवण्यात आल्या होत्या.


इंजिन आणि मायलेज


Tata Tiago मध्ये 3-सिलेंडर 1.2 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 86 PS ची कमाल पॉवर आणि 113 Nm कमाल टॉर्क जनरेट करते. यात 5-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सचा पर्याय मानक म्हणून मिळतो. या कारला 35 लिटर क्षमतेची इंधन टाकी मिळते. कंपनीचा दावा आहे की, ही कार 20.09 kmpl मायलेज देते. Tata Tiago ला 2400mm चा व्हीलबेस मिळतो. या कारची रुंदी 1677 मिमी, लांबी 3765 मिमी आणि उंची 1535 मिमी आहे.


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI