Upcoming Royal Enfield Hunter 350 : रॉयल एनफील्ड इंडिया आपली नवीन रॉयल एनफील्ड हंटर 350 बाईक भारतीय बाजारपेठेत लॉन्च करणार आहे. चाचणीदरम्यान या बाईकचे अनेक फोटो समोर आले आहेत. या बाईकच्या फीचर्सबद्दल माहिती समोर आली आहे. रॉयल एनफील्ड हंटर 350 मध्ये 14.87kW म्हणजेच 20.2 hp चे पॉवर आउटपुट असेल. जे कंपनीच्या इतर 349cc बाईक, जसे की Classic 350 आणि Meteor 350 सारखेच असेल. इंजिनच्या ट्यून केलेल्या स्थितीत कोणताही महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता नाही. ग्राहक कंपनीच्या इतर मॉडेल्सप्रमाणेच टॉर्क सुमारे 27 Nm असण्याची अपेक्षा करू शकता. 


हंटर क्लासिक आणि Meteor या दोन्हीपेक्षा लांबी आणि उंचीने लहान असण्याशी शक्यता आहे. हंटर 350 मध्ये एक लहान व्हीलबेस देखील असेल, जो क्लासिक 350 च्या 1,390 मिमी आणि Meteor च्या 1,400 मिमीच्या तुलनेत 1,370 मिमी ठेवला जाईल. हंटर 350 चे कर्ब वजन 180kg असेल, ज्यामुळे ही बाईक कंपनीच्या इतर बाईकपेक्षा 10kg ते 15kg हलकी असले. 


मीडिया रिपोर्टनुसार, हंटर 350 ही रॉयल एनफिल्डच्या लाँचनंतरची एंट्री लेव्हल बाईक असेल. हंटर 350 ची रचना रोडस्टर बाईकसारखी केली आहे. जी रॉयल एनफिल्डच्या क्रूझर बाईकपेक्षा अधिक स्टायलिश आणि स्पोर्टी दिसते. यात Meteor 350 प्रमाणेच अर्ध-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळू शकते. जे टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन फीचर्ससह येते. बाईकवरील लहान आणि उंचावलेला सायलेन्सर आणि मागील चाकाचा उंचावलेला मडगार्ड देखील याला रोडस्टर लूक देतो. बाईकला वर्तुळाकार हेडलाइट, टेललाइट आणि टर्न इंडिकेटर मिळू शकतात.


महत्वाच्या बातम्या : 



 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI