Honda City vs Maruti Ciaz vs Honda Verna : जर तुम्हाला हॅचबॅक किंवा SUV कारऐवजी सेडान कार आवडत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. बाजारात अनेक व्हरायटीच्या कार तुम्हाला पाहायला मिळतील. पण, यामध्ये नेमकी कोणती कार खरेदी करावी याबाबत जर तुमचा गोंधळ होत असेल तर या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी सेडान कारची तुलना इतर कारबरोबर करणार आहोत. मारुती सुझुकी सियाझ (Maruti Suzuki Ciaz), होंडा सिटी (Honda City) आणि ह्युंदाई वेर्ना (Hyundai Verna) या तीन कार आहेत. कदाचित यामधून तुम्हाला चांगली कार निवडण्याचा पर्याय मिळू शकेल. 


डायमेंशन 


ह्युंदाई वेर्ना (Hyundai Verna) :


या Hyundai sedan कारच्या डायमेंशनबद्दल बोलायचे झाल्यास या कारची लांबी 4440 mm, रुंदी 1729 mm, व्हीलबेस 2600 mm, उंची 1475 mm आहे. या कारच्या चाकाचा आकार 16 इंच, इंधन टाकीची क्षमता 45 लिटर आणि बूट स्पेस 480 लिटर आहे.


मारुती सियाझ (Maruti Ciaz)


या मारुती सेडान कारच्या डायमेंशनबद्दल सांगायचे तर, या कारची लांबी 4490 मिमी, रुंदी 1730 मिमी, व्हीलबेस 2650 मिमी, उंची 1485 मिमी आहे. याशिवाय यात 43 लीटर इंधन टाकी, 16 इंच साईझचे व्हील्स आहेत. 


होंडा सिटी (Honda City)


या होंडा कारच्या डायमेंशनबद्दल बोलायचे झाले तर, तिची लांबी 4549 मिमी, रुंदी 1748 मिमी, व्हीलबेस 2600 मिमी, उंची 1489 मिमी आहे. याशिवाय, कारला 40 लीटर क्षमतेची इंधन टाकी, 16 इंच आकाराची व्हील्स आणि 506 लीटरची जबरदस्त बूट स्पेस मिळते.


इंजिन कसं आहे? 


Hyundai Verna Sedan कारमध्ये, कंपनी 1.0 L पेट्रोल इंजिन देते, जे जास्तीत जास्त 118bhp पॉवर आणि सर्वाधिक 172Nm टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये MT/CVT/DCT गियर बॉक्स देण्यात आला आहे. या कारचे मायलेज 19.2 km/l पर्यंत आहे.


Maruti Suzuki Ciaz Sedan कारमध्ये दिलेले पेट्रोल इंजिन 1.5 L आहे, जे 113 bhp ची कमाल पॉवर आणि 144 Nm चे टॉर्क जनरेट करते. या कारला MT/AT गियर बॉक्स मिळतो आणि ही कार 18.4 किमी/l पर्यंत मायलेज देते.


Honda City Sedan कारला 1.5 L पेट्रोल क्षमतेचे इंजिन मिळते, जे 119bhp ची कमाल पॉवर आणि 145Nm चे टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. या कारला MT/CVT गिअरबॉक्स मिळतो आणि ही कार 18.4 किमी/l पर्यंत मायलेज देते.


निष्कर्ष काय?


डायमेंशनच्या बाबतीत, तिन्ही कार काहीशा फरकाने वेगळ्या आहेत. तर, Hyundai Verna मायलेज आणि इंधन क्षमतेच्या बाबतीत पुढे आहे. पण, इंजिनच्या बाबतीत दोन्ही कारच्या मागे आहे. तर, बूट स्पेसच्या बाबतीत मारुती सियाझ दोन्ही कारच्या पुढे आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


Mahindra XUV 400: महिंद्रा XUV400 ची लोकांमध्ये मोठी क्रेझ, आतापर्यंत 15 हजाराहून अधिक युनिट्स बुक


Car loan Information:

Calculate Car Loan EMI