KTM RC 125 Vs Suzuki Gixxer SF 250:  जर तुम्हाला स्पोर्ट्स बाईकची आवड असेल आणि तुम्हाला परवडणाऱ्या बजेटमध्ये स्वतःसाठी बाईक घ्यायची असेल, तर KTM ची RC 125 ही तुमच्या बजेटनुसार चांगली बाईक असू शकते. पण अलीकडेच सुझुकीने Suzuki Gixxer SF 250 लॉन्च केली आहे, जी KTM च्या RC 125 शी स्पर्धा करते. म्हणूनच आज आम्ही या दोन्ही बाईकची तुलना करणार आहोत. या दोन्ही बाईकमध्ये खूपच आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच या दोन्ही बाईक दिसायला जबरदस्त आहे, मात्र या दोन्ही बाईकमध्ये कोणती आहे बेस्ट...हे जाणून घेऊ...


Suzuki Gixxer SF 250 आणि KTM RC 125 : लूक 


KTM RC 125 स्पोर्ट्स बाईक RC 390 च्या छोट्या व्हर्जनसारखी दिसते. केटीएम मोटारसायकल तिच्या केशरी पेंटसह वेगळी आहे, जी कंपनीच्या सर्व बाईक सारखीच दिसू शकते. हा पेंट केटीएम बाईकला वेगळा लूक देतो. दुसरीकडे Suzuki Gixxer SF 250 ही बाईक Gixxer SF प्रमाणेच आहे. मात्र हिला  एक नवीन पेंट स्कीम देण्यात आली आहे, ज्यामध्ये नवीन मॅट फिनिश दिसत आहेत.


Suzuki Gixxer SF 250 आणि KTM RC 125 : इंजिन


इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास KTM RC 125 मध्ये 124.99 CC, लिक्विड-कूल्ड इंजिन आहे. जे 14.69 bhp पॉवर आणि 12 Nm टॉर्क जनरेट करते. याचे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्ससह जोडले गेले आहे. दुसरीकडे Gixxer SF स्पोर्ट्स बाईकमध्ये 249 CC, ऑइल-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे, जे या बाईकला 26.13 bhp पॉवर आणि 22.2 Nm टॉर्क देते. हे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.


Suzuki Gixxer SF 250 आणि KTM RC 125 : फीचर्स 


KTM आणि सुझुकी या दोन्ही स्पोर्ट्स बाईकमध्ये आढळलेल्या फीचर्सबद्दल सांगायचे तर, ही बाईक LCD डिस्प्ले, LED टेल लॅम्प आणि टर्न इंडिकेटर, तसेच सुपरमोटो ABS ने सुसज्ज आहेत. तर  Gixxer SF 250 अपडेट केल्यानंतर, ब्लूटूथ-सक्षम डिजिटल कन्सोल, सुझुकी इझी स्टार्ट सिस्टम आणि एलईडी हेडलॅम्प आणि टेल लॅम्प देखील जोडले गेले आहेत.


Suzuki Gixxer SF 250 आणि KTM RC 125 : किंमत


या दोन स्पोर्ट बाईक्सबद्दल बोलायचे झाले तर, KTM RC 125 1.87 लाख रुपयांच्या किमतीत आणि Suzuki Gixxer SF 250 बाईक 1.93 लाख रुपयांच्या किमतीत खरेदी केली जाऊ शकते.


इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातमी: 


Top 8 Safest Cars: 'या' आहेत भारतातील 8 सर्वात सुरक्षित कार, ग्लोबल क्रॅश टेस्टमध्ये मिळाली 5-स्टार रेटिंग


Car loan Information:

Calculate Car Loan EMI