Royal Enfield Diesel Bike: जेव्हा आपण दुचाकी किंवा बाईकच्या इंजिनबद्दल बोलतो तेव्हा पेट्रोलशिवाय (Petrol) दुसरा पर्याय नाही. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, याआधी डिझेल (Diesel) इंजिनवर चालणाऱ्या बाईक्सही देशात आल्या आहेत. रॉयल एनफिल्डसारख्या (Royal Enfield) आघाडीच्या दुचाकी निर्मात्या कंपनीने ही बाईक बनवली होती. 1993 मध्ये लॉन्च झालेल्या या बाईकचं नाव एनफील्ड डिझेल (Enfield Diesel) होतं, ज्याला रॉयल एनफील्ड टॉरस (Royal Enfield Taurus) आणि रॉयल एनफील्ड डिझेल बुलेट (Royal Enfield Diesel Bullet) असंही म्हटलं जातं. ही जगातील पहिली डिझेल बाईक होती, जी मोठ्या प्रमाणावर तयार केली गेली.


भारतात मोठ्या प्रमाणावर विकली गेली डिझेल बाईक


भारतात रॉयल एनफिल्डबद्दल एक वेगळंच क्रेझ आहे. देशाच्या स्वातंत्र्यापासून आजपर्यंत एनफिल्ड बाईक्सना खूप पसंती दिली जाते. 1993 मध्ये कंपनीने पहिली डिझेल बाईक बाजारात आणली. लोक आधीपासूनच रॉयल एनफिल्डचे चाहते होते, त्यांच्याकडे कमी किमतीची डिझेल बुलेट होती. भारतात डिझेल बुलेटची मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती.


हिरो स्प्लेंडरला लाजवेल इतकं मायलेज!


सध्या सर्वोत्तम मायलेज असलेल्या बाईक्सबद्दल बोलायचं झालं तर हिरो स्प्लेंडरचं नावही समोर येतं. स्प्लेंडर ही देशात सर्वाधिक विकली जाणारी मोटरसायकल असण्यामागे मायलेज हे देखील एक कारण आहे. पण रॉयल एनफिल्डच्या डिझेल बाईकचं मायलेज स्प्लेंडरलाही आश्चर्यचकित करू शकतं. असं म्हटलं जातं की, एनफिल्ड डिझेल प्रति लिटर 80 किलोमीटर मायलेज देत असे.


रॉयल एनफील्ड डिझेल: इंजिन तपशील


रॉयल एनफिल्डची एकमेव डिझेल बाईक 325cc इंजिन पॉवरसह आली होती. त्यावेळी चालणाऱ्या बुलेटच्या चेसिसवर कंपनीने डिझेल इंजिन बसवलं होतं. वेगाच्या बाबतीत ही बाईक थोडी कमी होती. ही बाईक ताशी 65 किलोमीटर वेगाने चालायची. बाईकचं वजन 196 किलो होतं, जे 168 किलोच्या बुलेटच्या वजनापेक्षा खूप जास्त होतं.


बंदी आल्यानंतरही उत्पादन राहिलं सुरुच 


त्यावेळी पेट्रोलपेक्षा डिझेल खूपच स्वस्त होतं, त्यामुळे डिझेल बुलेटची मोठ्या प्रमाणात विक्री होत होती. डिझेल इंजिन असल्याने त्यातून काळा धूर निघत असे, त्यामुळे अधिक प्रदूषण होत असे. या इंजिनमुळे बाईक खूप व्हायब्रेट व्हायची, त्यामुळे दुचाकीस्वाराला पाठदुखीचा धोका होता.


प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने नवे उत्सर्जन कायदे आणले, त्यामुळे त बंद करावे लागले. मात्र, या बाईकची इतकी प्रचंड क्रेझ होती की, उत्पादन बंद झाल्यानंतरही या बाईकची निर्मिती थांबली नाही. जेव्हा रॉयल एनफिल्ड डिझेल बुलेटचं उत्पादन थांबलं तेव्हा पंजाबमधील ट्रॅक्टर उत्पादक कंपनी सूरज ट्रॅक्टर्सने रॉयल एनफिल्ड सूरजचं उत्पादन सुरू केलं.


हेही वाचा:


Year End Discount: वर्षाच्या अखेरीस स्वस्तात कार खरेदी करण्याची संधी! Honda च्या 'या' कार्सवर विशेष ऑफर


Car loan Information:

Calculate Car Loan EMI