Rakesh Jhunjhunwala Death : भारतीय शेअर बाजाराचा बादशहा म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचे आज निधन झाले. ते भारतीय शेअर बाजाराचे बिग बुल अशा नावाने ओळखले जात होते. 1985 मध्ये शेअर मार्केटमध्ये प्रवेश केलेल्या या उद्योगपतीने कधीही मागे वळून पाहिले नाही आणि एप्रिल 2021 मध्ये 31,320 कोटी रुपयांच्या संपत्तीसह देशातील 100 सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांची गणना होते. यावरून त्यांच्या यशाचा अंदाज लावता येतो. अनेकदा अत्यंत साधे दिसणाऱ्या एवढ्या मोठ्या उद्योगपतीचे वैयक्तिक आयुष्य काही कमी नव्हते. ते महागड्या गाड्यांचे शौकीन होते. त्यांच्या कार कलेक्शनमध्ये कोणत्या गाड्या सामील आहेत ते जाणून घ्या.


BMW X5


राकेश झुनझुनवाला कारच्या यादीत पहिल्या क्रमांकावर BMW ची लक्झरी स्पोर्ट SUV X5 आहे. या कारमध्ये 2993 cc 6 सिलेंडर डिझेल इंजिन आहे जे 4000 rpm वर 265 hp पॉवर आणि 1500-2500 rpm वर 620 Nm टॉर्क निर्माण करते. या कारमध्ये 8-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स वापरण्यात आला आहे. BMW X5 चा कमाल वेग 230 Kmph आहे आणि त्याची किंमत 85 लाख रुपये आहे.


ऑडी Q7


राकेश झुनझुनवाला कारच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर फुल साइजची SUV Audi Q7 आहे. कारमध्ये 2967 cc V6 डिझेल इंजिन आहे जे 4500 rpm वर 249 PS पॉवर आणि 1500-3000 rpm वर 600 Nm टॉर्क निर्माण करते. याचा सर्वाधिक वेग 210 किमी प्रतितास आहे आणि 5.9 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग वाढवू शकतो. या कारची किंमत सुमारे एक कोटी रुपये आहे.


Mercedes Maybach S Class 


राकेश झुनझुनवाला कारच्या यादीत तिसरा क्रमांक मर्सिडीज मेबॅक एस-600 आहे. या कारमध्ये 5980 cc V12 प्रकारचे पेट्रोल इंजिन आहे जे 4900-5300 rpm वर 530 bhp पॉवर आणि 1900-4000 rpm वर 830 Nm टॉर्क निर्माण करते. या कारचा टॉप स्पीड 250 किमी/तास आहे आणि ती फक्त 5.0 सेकंदात 0-100 किमी/ताशी वेग पकडू शकते. या कारची किंमत 2.5 कोटी आहे.


संबंधित बातम्या


Rakesh Jhunjhunwala : पाच हजार रुपयांची गुंतवणूक ते शेअर बाजाराचा बादशाह, असा होता राकेश झुनझुनवाला यांचा प्रवास


 


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI