Anand Mahindra Tweeted Video Of Electric Bike :  देशात अनेक नवीन वाहन उत्पादक कंपनी आपल्या इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटर लॉन्च करत आहेत. यातच सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारे उद्योगपती आनंद महिंद्रा यांना अशीच एक इलेक्ट्रिक बाईक आवडली आहे. ही इलेक्ट्रिक बाईक सामान्य इलेक्ट्रिक बाईकसारखी नाही आहे. तसेच ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक बाईक आहे. याची रेंज देखील जबदस्त आहे. याच बाईकचा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ट्वीट केला आहे.

  


आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ गावात बनवलेल्या इलेक्ट्रिक बाईकचा आहे. यात चालकासह 6 लोक बसू शकतात. व्हिडीओत जी व्यक्ती ही बाईक चालवताना दिसत आहे, त्याने असं सांगितलं आहे की, ही बाईक एका चार्जमध्ये 150 किमी धावू शकते. तसेच ही बाईक 8 ते 10 रुपये खर्च करून पूर्णपणे चार्ज होते. या इलेक्ट्रिक बाईकची खास गोष्ट म्हणजे यात जास्त फीचर्स नाहीत, पण ग्रामीण भागात फिरण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. इतकंच नाही तर ही बाईक शेतात आणि रानात चालण्यासही सक्षम आहे. म्हणजेच यात ऑफ-रोडींगची क्षमता देखील आहे. याची किंमतही फक्त 12,000 रुपये असल्याचे व्हिडीओत असणाऱ्या व्यक्तीने सांगितले आहे.






या बाईकबद्दल आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या कंपनीचे मुख्य डिझायनर प्रताप बोस यांना सांगितले की, डिझाइनमध्ये किरकोळ बदल करून, चेसिससाठी एक Cylindrical सेक्शन बनवून ही बाईक जगभरात वापरली जाऊ शकते. युरोपमधील व्यस्त पर्यटन केंद्रांवर 'टूर बस' म्हणून याचा वापर केला जाऊ शकतो. आपल्या ट्विटमध्ये हा व्हिडीओ शेअर करत ते म्हणाले आहेत की,  खेड्यात आणि ग्रामीण भागातील वाहतुकीच्या नवनवीन शोधांनी मी नेहमीच प्रभावित होतो. जिथे खरंच, गरज ही शोधाची जननी आहे. 


इतर ऑटो संबंधित बातमी: 


Tata Blackbird : टाटा घेऊन येत आहे 'ब्लॅकबर्ड' नावाची आणखी एक जबरदस्त कार, ह्युंदाईच्या क्रेटाला देणार टक्कर


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI