Vehicle Sales Report : देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक वाहनांना मोठी मागणी आहे. देशात टाटाच्या इलेक्ट्रिक कार खूप पसंत केल्या जात आहेत. कंपनीने नोव्हेंबरमध्ये भारत आणि परदेशात एकूण 75,478 युनिट्सची विक्री केली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात विकल्या गेलेल्या 62,192 युनिट्सच्या तुलनेत हे YoY आधारावर 21 टक्के जास्त आहे. कंपनीने देशांतर्गत बाजारात 73,467 युनिट्सची विक्री केली. ज्यामध्ये कंपनीच्या विक्रीत 27 टक्के वाढ झाली.
इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत 146 टक्के वाढ
टाटा मोटर्सने भारतात 29,053 युनिट्सची विक्री नोंदवली आहे. जी नोव्हेंबर 2022 मध्ये विकल्या गेलेल्या 32,245 युनिट्सच्या तुलनेत 10 टक्के कमी आहे. प्रवासी वाहने 29,947 युनिट्सच्या तुलनेत 46,425 युनिट्सच्या विक्रीसह 55 टक्के वार्षिक विक्री वाढली आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीबद्दल बोलायचे झाल्यास, टाटा मोटर्सला नोव्हेंबर 2021 च्या तुलनेत या सेगमेंटमध्ये 146 टक्के वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. 4,451 युनिट्सच्या विक्रीसह त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे.
कंपनीने प्रवासी वाहनांच्या 45,220 युनिट्सची विक्री करून वार्षिक विक्रीत 33.3 टाक्यांची वाढ नोंदवली आहे. कंपनी Tata Nexon, Harrier, Safari, Punch आणि इतर अनेक मॉडेल्स भारतीय बाजारात विकते. याशिवाय इलेक्ट्रिक वाहने आणि पेट्रोल-डिझेलनंतर आता कंपनी सीएनजी वाहनांवरही लक्ष केंद्रित करत आहे. कंपनीने अलीकडेच Tata Tiago NRG CNG भारतीय बाजारपेठेत 7.40 लाख रुपये (एक्स-शोरूम) च्या प्रारंभिक किमतीत लॉन्च केली आहे. यापूर्वी टाटा मोटर्सने जानेवारीमध्ये टियागो आणि टिगोरचे सीएनजी व्हर्जन देखील लॉन्च केले होते. त्याचप्रमाणे कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहन मॉडेल लाइनअपमध्ये Tata Nexon, Tigor, Tiago सारख्या अनेक मॉडेल्सचा समावेश आहे. ज्यात Tata Nexon इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्ये विक्रीच्या बाबतीत आघाडीवर आहे.
महिंद्रा कारची बंपर विक्री, 30,238 पेक्षा जास्त युनिट्सची विक्री
महिंद्रानेही नोव्हेंबर 2022 साठी विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. गेल्या महिन्यात एकूण 58,303 वाहनांची विक्री झाली. यामध्ये कंपनीने युटिलिटी व्हेईकल सेगमेंटमध्ये 30,238 वाहनांची विक्री केली आहे. प्रवासी वाहनांच्या सेगमेंटमध्ये कंपनीने गेल्या महिन्यात 30,392 वाहने विकली आहेत. निर्यात केलेल्या वाहनांबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने 3,122 वाहने निर्यात केली आहेत. व्यावसायिक वाहन सेगमेंटमध्ये महिंद्राने नोव्हेंबर 2022 मध्ये 19,591 वाहनांची विक्री केली आहे.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI