Tata Blackbird SUV: देशात मिड साईझ एसयूव्ही खूप पसंत केली जाते. साईझ एसयूव्हीला खूप मागणी देखील आहे. या सेगमेंटमध्ये ह्युंदाई क्रेटाचे वर्चस्व आहे. या सेगमेंटमध्ये दुसरी सर्वाधिक विक्री होणारी कार Kia Seltos आहे. उर्वरित मिड साईझच्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये दुसरा कोणताही मजबूत पर्याय नाही. पण लवकरच टाटा मोटर्सही यात पाऊल टाकणार आहे. सध्या टाटाकडे नेक्सन आणि हॅरियर अनुक्रमे 4 मीटर आणि 4.6 मीटरमध्ये आहेत. पण आगामी नवीन एसयूव्ही या दोघांमध्ये असणार आहे. म्हणजेच क्रेटा आणि सेल्टोसला टाटाच्या कारला लवकरच टक्कर मिळणार आहे.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, आगामी नवीन SUV सध्याच्या Nexon वर आधारित असेल. पण याची लांबी Nexon पेक्षा सुमारे 4.3 मीटर जास्त असेल. कंपनी या नवीन वाहनाला ब्लॅकबर्ड असे नाव देऊ शकते. मात्र हे नाव फायनल नसून कंपनी यात बदलही करू शकते. आगामी Blackbird SUV कंपनीची सर्वाधिक विकली जाणारी कार Nexon च्या X1 प्लॅटफॉर्मवर तयार केली जाऊ शकते. पण याचा आकार मोठा असेल. त्यामुळे यात अधिक जागा आणि अधिक बूट स्पेस पाहायला मिळेल. याची डिझाइन नवीन असू शकते आणि याचा पुढचा आणि मागचा लूक वेगवेगळ्या डिझाइनमध्ये मिळण्याची शक्यता आहे.


इंजिन 


या कारमध्ये नवीन 1.5-लिटर पेट्रोल इंजिन वापरले जाऊ शकते. जे Nexon मध्ये असलेल्या 1.2-litre Revotron इंजिनपेक्षा मोठे आणि अधिक पॉवरफुल असेल. हे इंजिन 160 hp पॉवर जनरेट करेल. तसेच मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय यामध्ये मिळू शकतो. या कारची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत सुमारे 11 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.


क्रेटाशी होणार स्पर्धा


आगामी ब्लॅकबर्ड भारतीय बाजारपेठेत ह्युंदाई क्रेटाशी स्पर्धा करेल. ही कार तीन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये 1.5-लिटर MPI पेट्रोल इंजिन, 1.5-लीटर U2 CRDi डिझेल इंजिन आणि 1.4-लिटर कप्पा टर्बो GDI पेट्रोल समाविष्ट आहे. जे अनुक्रमे 113bhp आणि 143.8Nm, 113bhp आणि 250Nm आणि 138bhp चे आउटपुट जनरेट करतात. ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.


इतर महत्वाची बातमी: 


kia Sonet आणि Audi Q7; तारक मेहता का उल्टा चश्माच्या जेठालालकडे आहे आलिशान गाड्यांचं कलेक्शन, पाहा संपूर्ण लिस्ट


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI