Electric Vehicle Battery: भारतातील आघाडीची इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी Ola  इलेक्ट्रिकने इस्त्रायली बॅटरी टेक्नॉलॉजी कंपनी Storedot मध्ये गुंतवणूक केली आहे. ही कंपनी अत्यंत वेगवान चार्जिंग टेक्नॉलॉजी बॅटरीमध्ये आघाडीवर आहे. कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार, ओला इलेक्ट्रिकने नियोजित केलेल्या अनेक जागतिक धोरणात्मक गुंतवणुकीपैकी स्टोअरडॉटमधील गुंतवणूक ही पहिली गुंतवणूक आहे. कंपनी सेल केमिस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग तसेच इतर बॅटरी टेक्नॉलॉजी आणि नवीन एनर्जी सिस्टीममध्ये आपला मूळ आर अँड डी वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.


Storedot एक्सट्रीम फास्ट चार्जिंग- '5-मिनिट चार्ज' EV बॅटरी टेक्नॉलॉजीवर काम करत आहे. कंपनीची काही वर्षांत मोठ्या प्रमाणात उत्पादनाची योजना आहे. बाजाराची वाढती मागणी लक्षात घेऊन पुढील 10 वर्षांत कंपनी  '2-मिनिट चार्ज' टेक्नॉलॉजीवर काम करण्याची कंपनीची योजना आहे. तसेच कंपनीने 5-मिनिट चार्ज EV बॅटरी टेक्नॉलॉजीवर काम सुरू केले आहे.


लिथियम-आयन बॅटरीच्या तुलनेत याच्या सिलिकॉन-प्रमुख असलेली एनोड टेक्नॉलॉजीत खूप सुधारणा करण्यात आली आहे. या टेक्नॉलॉजीने इलेक्ट्रिक चार्जिंग वेळ काही तासांवरून 5 मिनिटात वाहनांची बॅटरी चार्ज करते.   Storedot मधील गुंतवणुकीचा एक भाग म्हणून Ola Electric ला कंपनीच्या अत्याधुनिक XFC बॅटरी टेक्नॉलॉजीत प्रवेश मिळेल. जी फक्त 5 मिनिटांत 0 ते 100% पर्यंत बॅटरी चार्ज करते.


भारतात ओलाकडे स्टोअरडॉटच्या फास्ट चार्ज टेक्नॉलॉजीच्या बॅटरी निर्मितीचा विशेष अधिकार देखील असणार आहे. जगातील सर्वात मोठा दुचाकी कारखाना Ola Futurefactory द्वारे निर्माण होणारी मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनी देशात सेलच्या निर्मितीसाठी गीगा कारखाना सुरू करण्याचा विचार करत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI