Activa Electric Scooter: भारतात इंधनाचे दर गगनाला भिडल्यानंतर बऱ्याच लोकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric Vehicle) वळताना दिसत आहे. यामुळेच इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशातच आता बरेच वाहन निर्माता कंपनी आपल्या वाहनाचे इलेक्ट्रिक व्हर्जन सादर करताना दिसत आहे. यामध्येच प्रसिद्ध दुचाकी निर्माता कंपनी होंडा इंडिया भारतात लवकरच आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या Activa चा इलेक्ट्रिक व्हेरिएंट सादर करणार आहे. कंपनीने मागच्याच महिन्यात घोषणा केली होती की, कंपनी भारतात इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च (Honda Activa Electric Scooter) करण्याची योजना आखात आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनी अत्याधुनिक फीचर्स देऊ शकते.
Activa नावानेच लॉन्च होणार स्कूटर
Honda Activa ही सध्या भारतात सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर आहे. होंडा आपल्या आगामी इलेक्ट्रिक स्कूटरसाठी हेच नाव वापरू शकते. यामुळे ग्राहकांना ब्रँडशी जोडणे सोपे होईल, कारण 'अॅक्टिव्हा' नेमप्लेट ब्रँडचे यूएसपी असून या नावावर ग्राहकांचा विश्वास आहे.
Benley इलेक्ट्रिक स्कूटरची टेस्टिंग करत आहे होंडा
होंडा इंडिया सध्या भारतात Benley इलेक्ट्रिक स्कूटरची टेस्टिंग करत आहे. टेस्टिंग दरम्यान ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) येथे ही स्कूटर पाहण्यात आली आहे. Benley इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल बोलायचे झाल्यास, होंडा जपानमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरचे चार वेगवेगळे मॉडेल ऑफर करते. इलेक्ट्रिक स्कूटरची Benley श्रेणी प्रामुख्याने B2B आणि B2C या दोन्ही सेगमेंटमध्ये असल्याचं पाहायला मिळालं आहे. पॉवरट्रेन आणि हार्डवेअरचा वापर प्रवाशांसाठी अनुकूल इलेक्ट्रिक स्कूटरला पॉवर देण्यासाठी केला जाऊ शकतो.
Benley स्कूटर आधी होणार लॉन्च
Benley इलेक्ट्रिक स्कूटरची चाचणी आधीच झाली आहे, त्यामुळे ही इलेक्ट्रिक स्कूटर आगामी Honda 'Activa' इलेक्ट्रिकच्या आधी लॉन्च केली जाऊ शकते. तसेच होंडा आपली Activa Electric 2023 मध्ये लॉन्च करू शकते. याशिवाय, होंडाच्या आंतरराष्ट्रीय उत्पादन पोर्टफोलिओमध्ये इतर इलेक्ट्रिक स्कूटर देखील आहेत. यामध्ये Honda PCX इलेक्ट्रिक, Honda Gyro e:, Honda Gyro Canopy e: आणि इतर अनेक इलेक्ट्रिक स्कूटर्सचा समावेश आहे.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI