New 2022 KTM RC 390 : KTM रेंजमध्ये एक नवीन बाईक लवकरच भारतीय बाजारात येणार आहे. या नवीन बाईकमध्ये अपडेटेड RC 390 सह वेबसाईटवर 3.14 लाख रूपये किंमत सांगण्यात आली आहे. आधीच्या RC 390 च्या तुलनेत या नवीन बाईकमध्ये साधारण 36,000 रुपयांची वाढ झाली आहे. New 2022 KTM RC 390 बाईकचे आणखी कोणते फीचर्स आहेत ते जाणून घ्या. 


नवीन डिझाईन ही थोड्याफार प्रमाणात जुन्या बाईकच्या मॉडेलसारखी आहे. परंतु RC 125 आणि 200 सारख्या कमी पॉवरफुल RC मॉडेल्सना देखील किरकोळ अपग्रेड्स दिले गेले आहेत. नवीन बाईकचा कलर KTM इलेक्ट्रॉनिक ऑरेंज आणि KTM फॅक्टरी रेसिंग ब्लू आहे.




बाईकसह मिळणारे इतर फीचर्स म्हणजे साइड-स्लंग एक्झॉस्ट, ब्लूटूथ TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ट्रॅक्शन कंट्रोल आणि एलईडी हेडलाइट. 43.5 Bhp पासून पॉवर आउटपुट बदलला नसला तरी, 373cc लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलेंडर इंजिनच्या अपडेटमुळे टॉर्क फीगर वाढली आहे. टॉर्क 37Nm वर क्लॉक आहे आणि 6-स्पीड गिअरबॉक्सशी देखील जोडलेला आहे.


390 ड्यूक आणि अॅडव्हेंचर मधील नवीन वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे ते RC 390 मध्ये आले आहे. 




नवीन RC 390 ही तुलनेने जरी महाग असली तरी बाईकप्रेमींसाठी उत्कृष्ट मॉडेल आणि फीचर्ससह उपलब्ध असणाऱ्या या बाईकची किंमत जरी जास्त असली तरी बाईक प्रेमींसाठी ही ड्रीम बाईक असू शकते. बाईकच्या लॉन्चची किंमत अजून तरी उघड झाली नाही.   


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI