Skoda Slavia First Look: वाहन निर्माता स्कोडा (Skoda) कंपनीची नवी कार स्लाव्हियाचा (Slavia) फर्स्ट लूक समोर आलाय. सेडान कारला पसंती दर्शवणाऱ्या लोकांसाठी ही कार उत्तम पर्याय असणार आहे. स्कोडाचा भारतातील सेडान कारमध्ये चांगली कामगिरी करण्याचा इतिहास आहे. यामुळं ही कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांची उत्सुकता वाढलीय. ही कार पुढच्या वर्षी बाजारात दाखल होणार आहे. या कारची प्री-बुकिंग सुरू झालीय. तर, या कारची खासियत काय? जाणून घेऊयात.
या कारला पहिल्यांदा पहिल्यानंतर ही कार डी-सेगमेन्टची कार दिसते. या कारला जबरदस्त लूक देण्यात आलाय. ही कार जवळपास स्कोडाच्या Octavia सारखीच दिसते. या कारची लांबी 4 हजार 541 एमएम इतकी आहे. तर, रुंदी 1 हजार 752 एमएम आहे. यात हेक्सागोनल क्रोम ग्रिलला नवी डिजाईन देण्यात आलीय. या कारमध्ये एलईडी डीआरएस आहे, पण बंपरच्या खालच्या भागालाही उत्तम लूक देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. या कारचा टॉप-ऍण्ड व्हर्जन 16 इंच अलॉयसह येतो आणि त्याच्या स्टान्सला चांगला लूक मिळालाय. कारच्या मागच्या बाजूला सी-शेपमध्ये टेल लॅम्प देण्यात आलंय. ग्राहकांना ही कार पाच रंगात खरेदी करता येणार आहे.
इंजिन-
सेडान कारमध्ये 1.0 लीटर टीएसआय पेट्रोल आणि 1.56 लीटर सीएसआय पेट्रोल इंजन मिळतो. लहान तीन सिलेंडर असलेले पेट्रोल इंजन 113 बीपीएच पॉवर आणि 175 एनएमची टार्क जनरेट करण्यात सक्षम आहे. हे 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्यायांसह उपलब्ध आहे. मोठे 1.5-लिटर चार-सिलेंडर टर्बोचार्ज केलेले इंजिन 150 बीपीएच पॉवर आणि 250 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे 6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड सीएसजी ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्यायांसह उपलब्ध आहे.
स्लाव्हिया कार तिच्या प्रीमियम लूकमुळे, मोठ्या आकारमानामुळे आणि चांगल्या उपकरणांमुळे प्रथमदर्शनी प्रभावित करते. हे खरं आहे की ही कार त्याच्या प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देऊ शकते. ही सेडान कार सी सेगमेंट मिडसाईज ऐवजी उच्च सेगमेंटची आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-
- Mercedes ने लाँच केली A45S कार; अवघ्या तीन सेकंदात 'या' वेगाने सुस्साट!
- Honda SUV : भारतात लवकरच होंडा लाँच करणार 'या' दोन एसयूव्ही
- New E-Scooter Launch : Suzuki ची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच लॉन्च; 'या' ई-स्कूटर्सना देणार टक्कर
Car loan Information:
Calculate Car Loan EMI