Mercedes-Benz New Car A45S : जर्मनीची लक्झरी कार कंपनी मर्सिडज-बेंझने (Mercedes-Benz) शुक्रवारी आपली नवीन कॉम्पॅक्ट कार एएमजी ए-45 एस 4 मॅटिक+ सादर केली. या कारची एक्स-शोरूम किंमत 79.50 लाख इतकी आहे. मर्सिडिज-बेंझ इंडियाने म्हटले की, ही कारमध्ये 2 लीटर टर्बोचार्ज्ड इंजिन आहे. या इंजिनमुळे 421 अश्वशक्ती मिळते. ही कार अवघ्या 3.9 सेकंदात 0-100 किमी प्रति तास इतका वेग पकडते. या कारचा अधिकाधिक वेग 270 किमी प्रतितास इतका आहे. 


या कारमध्ये एएमजी स्पीडशिफ्ट डीसीटी 8जी ट्रान्समिशन आहे. ज्याला विशेष करून एएमजी ए45 एस इंजिनला जोडण्यात आले आहे. या कारमध्ये एएमजी अॅक्टिव्ह राइड कंट्रोल आणि एएमजी परफॉर्मन्स 4मॅटिक+ ऑल-व्हील ड्राइव्ह एएमजी टॉर्क कंट्रोल दिले आहेत. कारमध्ये एक विशिष्ट ड्रिफ्ट मोड देखील आहे. कारमध्ये स्लिपरी, कम्फर्ट, स्पोर्ट, स्पोर्ट +, इंडिव्हिजुअल आणि रेस ड्राइव्ह मोड आहेत. 


मर्सिडिज-बेंझ इंडियाचे संचालक आणि सीईओ मार्टिन श्वेंक यांनी म्हटले की आम्ही नवीन मर्सिडिज-एएमजी ए45 एस 4 मॅटिक+ भारतात लाँच केली आहे. आम्ही आपल्या ए-क्लास श्रेणीला मजबूत करत आहोत. ही देशातील सर्वात महागडी हॅचबॅक कार आहे. कंपनी नव्या पिढीतील स्पोर्ट्स कारलाही महत्त्व देत असल्याचे त्यांनी सांगितले. 


ही कार दिसण्यासही शानदार आहे. A45S मध्ये ट्विन टेल पाइप्स, मोठे व्हिल्स, स्पोर्टियर स्टान्स आहे. मर्सिडिज ही शानदार सन येल्लो, माउंटेन ग्रे, डिझानो पॅटागोनिया रेड, डिझानो माउंटन ग्रे मॅग्नो आणि कॉसमॉस ब्लॅक या रंगात उपलब्ध आहे. कारचे इंटिरियर्सही शानदार आहे. यामध्ये स्पोर्ट्स सीट्स आहे. तर, कॉन्ट्रास्ट टॉपस्टिचिंग आहे. यामध्ये हेड अप डिस्प्लेदेखील आहे. त्याशिवाय, 12 स्पीकर साउंड सिस्टिमसह इतरही शानदार सुविधा आहेत.  


इतर महत्त्वाच्या बातम्या :


Honda SUV : भारतात लवकरच होंडा लाँच करणार 'या' दोन एसयूव्ही


बॅटरीशिवाय फक्त 50 हजार रुपयांत खरेदी करता येणार ई-स्कूटर; 'या' कंपनीची खास ऑफर


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


Car loan Information:

Calculate Car Loan EMI