New E-Scooter Launch : भारतात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वेगाने वाढत आहे. डिझेल आणि पेट्रोल वाहनांच्या तुलनेत त्यांना चालवण्याचा खर्चही खूप कमी आहे. इलेक्ट्रिक कार आणि इलेक्ट्रिक स्कूटर लोकांमध्ये खूप लोकप्रिय होत आहेत. स्पोर्ट्स बाईकसाठी प्रसिद्ध असलेली सुझुकी कंपनी आता इलेक्ट्रिक स्कूटी सेगमेंटमध्येही बाजारात उतरण्यासाठी सज्ज झाली आहे. सुझुकी कंपनी आता लवकरच सुझुकी बर्गमन इलेक्ट्रिक (Suzuki Burgman Electric) 18 नोव्हेंबर 2021 रोजी जागतिक स्तरावर लॉन्च करणार आहे. सुझुकीची ही पिहिलीच ई-स्कूटर आहे. दरम्यान भारतात ही स्कूटर कधीपर्यंत येईल, याबाबतच कोणतीही निश्चित माहिती नाही. मात्र या स्कूटरचे फीचर्स बाजार चर्चेचा विषय झाला आहे. या स्कूटरमध्ये काय खास असू शकते ते जाणून घेऊया.
कसा असेल लूक?
रिपोर्ट्सनुसार, सुझुकी बर्गमन इलेक्ट्रिक (Suzuki Burgman Electric) ग्लोबली लॉन्च झाल्यानंतर लवकरच भारतात लॉन्च करेल. या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी ती भारतातच प्लांट उभारणार आहे. या स्कूटरचं इंजिन 125cc असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याची बॅटरी देखील अधिक पावरफुल असेल आणि ती एकदा चार्ज केल्यानंतर जास्त काळ चालेल. कंपनीने त्याच्या लूकवर बरेच काम केले आहे आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी भारतीय बाजारात या ई-स्कूटरची किंमत 1 लाख रुपयांपर्यंत असू शकते. तर सध्याच्या अनेक ई-स्कूटर्सना ती टक्कर देऊ शकते असे जाणाकारांचे म्हणणे आहे.
सुझुकी बर्गमन इलेक्ट्रिकची कुणाशी टक्कर कोणाशी?
सध्या भारतीय बाजारपेठ ई-स्कूटर्स मोठ्या प्रमाणात आहे. अनेक कंपन्या सातत्याने नवनवीन ई-स्कूटर्स बाजारात आणत आहेत. सुझुकीची ई-स्कूटर भारतात लाँच झाल्यानंतर या स्कूटरची बजाज चेतक, TVS iQube, Ola Electric, Ola S1, Ola S1 Pro, Bajaj, Hero, Pure Motors, Ather आणि Simple Energy सारख्या लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटरशी थेट स्पर्धा करण्याची शक्यता आहे. या सर्व ई-स्कूटरमध्ये बरीच वैशिष्ट्ये आहेत आणि त्यांची किंमत 1 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. काही दिवसांनी ही कंपनी होंडा कंपनीशीही स्पर्धा करू शकते. Honda सुद्धा लवकरच भारतात आपली ई-स्कूटर लॉन्च करू शकते असे वृत्त आहे. कंपनीची ई-स्कूटर अनेक जबरदस्त फीचर्सने सज्ज असेल.
संबंधीत बातम्या
Honda Motorcycle and Scooter India : EV सेगमेंटमध्ये 'होंडा' कंपनीची एन्ट्री
Best Electric Bikes : भारतात उपलब्ध असलेल्या दमदार इलेक्ट्रिक बाईक, काय आहेत फीचर्स?
Car loan Information:
Calculate Car Loan EMI