WhatsApp Trick : चॅटिंग करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर अनेक लोक करतात. फोटो आणि व्हिडीओ मित्रमैत्रीणींना फॉरवर्ड करण्यासाठी देखील व्हॉट्सअ‍ॅपचा वापर केला जातो. अनेक वेळा चॅटिंग कराना एखादा मेसेज जर चुकून डिलीट होतो तो मेसेज  परत मिळवण्यासाठी ही सोपी ट्रिक वापरा. या ट्रिकमुळे तुम्ही डिलीट केलेला मेसेज रीस्टोअर करू शकता. 


लोकल बॅक-अप 
-जर तुमच्याकडून व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधील मेसेज चुकून डिलीट झाला, तर तो मेसेज तुम्ही लोकल बॅक-अपमधून पुन्हा मिळवू शकता. यासाठी ही प्रोसेस करा- 
-सर्वप्रथम फोनमधील फाइल मॅनेजर ओपन करा. जर तुमच्या फोनमध्ये फाइल मॅनेजर नसेल तर प्ले-स्टोअरमधून फाइल मॅनेजर डाऊनलोड करा. 
-फाइल मॅनेजरमध्ये  व्हॉट्सअ‍ॅप नावाचा फोल्डर असेल. तो फोल्डर ओपन करा. 
- व्हॉट्सअ‍ॅप फोल्डरमधील डेटाबेस ऑप्शन सिलेक्ट करा. 
-डेटाबेस ऑप्शनमध्ये तुम्हाला चॅट हिस्ट्री दिसेल. 
-चॅट हिस्ट्री डेटनुसार सेट करून  त्यामध्ये डिलीट झालेला मेसेज शोधा. 
-जर तुमच्या फोनमध्ये  इंटरनल स्टोरेज  ऐवजी एसडी कार्ड बॅकअप आहे. तर त्यामधून तो मेसेज कॉपी करा. फोनच्या इंटरनल स्टोरेजमध्ये बनवलेल्या WhatsApp फोल्डरच्या डेटाबेस फोल्डरमध्ये तो मेसेज पेस्ट करा.
-आता फोनमधील व्हॉट्सअ‍ॅप  uninstall करून पुन्हा  install  करा. 
-इनस्टॉल केल्यानंतर  फोन स्क्रिनवर  Allow WhatsApp to restore your chat history असं लिहीलेले दिसेल. त्यानंतर Allow वर क्लिक करा. 
-त्यानंतर  जुन्या डेटच्या चॅट बॅकअपसाठी डेटाबेस फोल्डर सिलेक्ट करा. त्यामधील ती तारिख शोधा ज्या तारखेचा मेसेज तुम्हाला पुन्हा हवा आहे. आता त्या  फाइलला रिनेम करा. या दरम्यान, त्या फाईलच्या नावामधून फक्त तारीख काढून टाका. 
- त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप फोनमधील व्हॉट्सअ‍ॅप  uninstall करून पुन्हा  install  करा. तुम्हाला डिलीट झालेला मेसेज मिळेल. 


WhatsApp New Features: आता व्हॉट्सअॅप वेबमध्ये मिळणार मोबाईल अ‍ॅपचे फिचर्स; काम होणार सोपे


WhatsApp Features : व्हॉट्सअ‍ॅपचे नवे फिचर्स; यूझर्ससाठी पर्वणी, काय आहे खास


Web media editor :  कंप्यूटरवर व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करत असताना जर तुम्हाला फोटो एडिट करायचा असेल व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या मीडिया एडिटर नावाच्या फिचरचा वापर तुम्ही करू शकता. 


Sticker Suggestions : चॅटिंग करताना अनेक लोक स्टिकरचा वापर करतात. वेगवेगळे स्टिकर शोधण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने  Sticker Suggestions हे नवे फिचर आणले आहे. 


Link Previews : लिंक प्रीव्ह्यू या व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या फिचरद्वारे तुम्ही कुटुंबियांसोबत किंवा मित्रमैत्रीणींसोबत वेगवेगळ्या कंटेंटच्या लिंक शेअर करू शकता. 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI