New Baleno features :  मारुती सुझुकी (Maruti Suzuki) कंपनीची प्रसिद्ध कार बलेनो (Baleno) आता आधुनिक फिचर्ससह काहीशा नव्या रुपात रस्त्यावर फिरताना दिसणार आहे. कंपनीने 2022 मधील नव्या बलेनो कारची बुकिंग नुकतीच सुरु केली असून या महिन्याच्या अखेरीस 23 तारखेच्या आसपास गाडी अधिकृतरित्या लॉन्च होणार आहे. या कारमध्ये हेड्सअप डिस्प्लेसह (Heads up display) इड्ल स्टार्ट-स्टॉप फंक्शनची (idle start/stop function) सुविधा असणारं पेट्रोल इंजिन बसवलं जाणार आहे.


या नवीन बलेनोच्या डिझाईनमध्ये काही नवे बदल करण्यात आले आहेत. यावेळी कारला एक मोठी ग्रिल, नवीन हेडलॅम्प आणि नवीन अलॉय व्हील डिझाइन तसेच मागील स्टाइलिंग देखील बदलण्यात आले आहे. याशिवाय आधीच लीक झाल्याप्रमाणे कारच्या एक्सटीरियरला संपूर्ण फेसलिफ्ट देण्यात आले असून इंटीरियरमध्ये बदल करण्यात आले आहेत. हॅचबॅकच्या पॅनललाही नव्याने डिझाईन करण्यात आले आहे. यामध्ये फ्रंट ग्रिल, हेडलॅम्प्स, एलईडी डीआरएल, फ्रंट आणि रिअर बंपर आणि टेललाइट्स अपडेट केले आहेत. सध्याच्या मॉडेलपेक्षा नवीन कारला अधिक स्पोर्टी लूक देण्यात आला आहे.  


इंजिनमध्ये अधिक बदल नाही


बलेनोच्या इंजिनमध्ये अधिक बदल करण्यात आलेले नाहीत. कारमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिनमध्ये माईल्ड हायब्रिड इंजिनसह आधुनिक असे इड्ल स्टार्ट-स्टॉप फंक्शन पुरवण्यात आले आहे. तसचं HUD (हेड अप डिस्प्ले), रियर कॅमेरा डिस्प्ले, क्लायमेट कंट्रोल, रिअर एसी व्हेंट असेल. तसंच CVT च्या जागी AMT गिअरबॉक्स देण्यात आले आहेत. शिवाय, सुरक्षेच्या बाबतीत यात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कारच्या टॉप-एंड प्रकारात तुम्हाला 6 एअरबॅग मिळतील.  


हे ही वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha



Car loan Information:

Calculate Car Loan EMI