Hyundai Venue : Hyundai Motor India ने नवीन जनरेशनची कार  Hyundai Venue 2022 लाँच करण्यास तयार आहे.. यासोबतच, कंपनीने नवीन व्हेन्यूचा फर्स्ट लुक देखील जाहीर केला आहे, ज्यामध्ये या एसयूव्हीचे सर्व एक्सटीरियर डिटेल्स आहेत. भारतात सर्वाधिक विक्री होणारी कॉम्पॅक्ट SUV Tata Nexon तसेच मारुती सुझुकी Vitara Brezza यांना टक्कर देण्यासाठी ही नवीन Hyundai Venue कधी लॉन्च होणार? तसेच याचा नवा लुक कसा असेल? जाणून घ्या


Hyundai India 16 जून रोजी भारतात आपले नवीन व्हेन्यू फेसलिफ्ट लॉन्च करणार आहे. कंपनी बोल्ड आणि बिग परसोनासह तसेच उत्कृष्ट बाह्य आणि अंतर्गत फिचर्ससह सादर करण्याची तयारी करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2022 Hyundai Venue फेसलिफ्टची सुरुवातीची किंमत 7.2 लाख रुपये असू शकते. Hyundai ने या SUV च्या लूकचे लॉंच करताना तारीख जाहीर करण्यात आली आहे.


2022 Hyundai Venue कंपनीने जारी केलेल्या फोटोनुसार, ही कार अधिक स्पोर्टी दिसत आहे आणि त्यात अनेक नवीन गोष्टी दाखवल्या आहेत. Venue 2022 मध्ये क्रोम ट्रीटमेंट, स्प्लिट हेडलॅम्प क्लस्टर, LED DRLs, सुधारित फ्रंट बंपर आणि नवीन अलॉय व्हीलसह 3D ग्रिल्सही मिळतील. त्याच वेळी, जेव्हा Venue कारचे फिचर्स पाहता त्यात एल-आकाराचे टेललॅम्प, टेलगेटच्या वर प्रथम एलईडी स्ट्राइप, सुधारित बंपर आणि शार्क फिन अँटेना यासह अनेक वैशिष्ट्ये दिसतात.


लेटेस्ट फिचर्स आणि शक्तिशाली इंजिन
2022 ह्युंदाई व्हेन्यू कारच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, यात एक चांगला डॅशबोर्ड, अपडेटेड 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, बोस साउंड सिस्टम आणि अॅम्बियंट लाइटिंग तसेच 360- यांसारखी नवीन वैशिष्ट्ये मिळतील. 2022 Hyundai Venue कारमध्ये 1.2-लिटर नेचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन, 1.5-लीटर CRDi डिझेल इंजिन आणि 1.0-लीटर GDi टर्बो पेट्रोल इंजिन पाहायला मिळेल. त्याच वेळी, ट्रान्समिशन पर्यायांच्या बाबतीत, ते 5 स्पीड मॅन्युअल, 6 स्पीड मॅन्युअल, 6 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर, 6 स्पीड क्लचलेस iMT आणि 7 स्पीड डीसीटी ऑटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये पाहिले जाऊ शकते.


संबंधित बातम्या


Auto sales in May 2022 : मे महिन्यात गाड्यांच्या विक्रीत तिप्पट वाढ, टाटा मोटर्सचा नवा विक्रम


Hyundai cars : Hyundai च्या 'या' पाच कार्सना मिळतेय ग्राहकांची पसंती; तुमची आवडती कार कितव्या क्रमांकावर आहे जाणून घ्या


Grand i10 NIOS : Hyundai Grand i10 NIOS कारचे नवीन व्हर्जन लॉन्च; कमी किंमतीत मिळतीत दमदार फीचर्स


Car loan Information:

Calculate Car Loan EMI