New Kia Car with Updated Engine : प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी Hyundai अलीकडेच आपले 2.0L इंजिन बंद केले आहे. कंपनीने नवीन RDE नियमांनुसार 1.5L टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनसह Alcazar लॉन्च केली होती, ज्याची एक्स-शोरूम किंमत 16.75 लाख रुपये आहे. अशातच आता Kia ने 1.5L टर्बो पेट्रोल इंजिन Kia Carens देखील लॉन्च केली आहे. याचे इंजिन कोणतेही आवाज करत नाही. नवीन RDE नियमांमुळे कंपनीने त्यांचे 1.4 टर्बो इंजिन बंद केले आहे. नवीन Carens ची प्रारंभिक किंमत 12 लाख रुपये एक्स-शोरूम आहे. कंपनीने नवीन इंजिनसह ही कार चार प्रीमियम, प्रेस्टिज, लक्झरी आणि लक्झरी प्लस व्हेरियंटमध्ये सादर केली आहे.


New Kia Car with Updated Engine : इंजिन


नवीन Kia Carens चे 1.5 टर्बो इंजिन 160bhp पॉवर आणि 260NM टॉर्क निर्माण करण्यास सक्षम असेल. यासह, 6-स्पीड IMT आणि 7-स्पीड DCT गिअरबॉक्स जोडले गेले आहेत. नवीन इंजिन देण्याव्यतिरिक्त या एमपीव्ही कारमध्ये इतर कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.


यामध्ये आणखी दोन इंजिन ऑफर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये पहिले 1.5 टर्बो चार्ज केलेले डिझेल इंजिन 115bhp पॉवर आणि 250Nm टॉर्क देण्यास सक्षम आहे. यासोबतच 6-स्पीड IMT आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे. आणखी एक 1.5L पेट्रोल इंजिन आहे, जे 115bhp पॉवर आणि 145Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. हे 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह जोडलेले आहे.


New Kia Car with Updated Engine : फीचर्स


फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात कनेक्टेड कार तंत्रज्ञानासह 10.25 इंच टच-स्क्रीन सिस्टम, अॅपल कार प्ले आणि अँड्रॉइड सिस्टम, ऑटो क्लायमेट कंट्रोल सिस्टम, कीलेस एंट्री, क्रूझ कंट्रोल, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, वायरलेस फोन चार्जिंग, रीअरव्ह्यू कॅमेरा, डिजिटल फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय यात सहा एअरबॅग्ज, एबीएस, ईएससी, हिल स्टार्ट, डिसेंट कंट्रोल आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम सारखी सेफ्टी फीचर्सही देण्यात आली आहेत. 


New Kia Car with Updated Engine : या करशी होणार स्पर्धा


Kia Carens कार त्याच्या सेगमेंटमध्ये Hyundai Alcazar, Maruti Ertiga, Maruti XL6 आणि Mahindra Marazzo सारख्या कारशी स्पर्धा करते. यातच Maruti XL6 या कारचा लूक स्टाइलिश आहे. या कारमध्ये नव्या स्विफ्टप्रमाणे क्रोमबार आहे. फ्रंट बंपरदेखील एसयुव्ही प्रमाणे आहे. Maruti XL6 ही कार एसयूव्ही आणि एमपीव्ही यांचे कॉम्बिनेशन असावे अशी दिसते. या कारचे सर्वात मोठे फीचर म्हणजे या कारला 16 इंची आकाराचे ड्युअल टोन Alloy Wheels आहे. रिअर टेल लॅम्प ह्या एलईडी असून त्यांना ग्रे लेन्स आहेत. 


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI