New Car Launches in July 2023 : जुलैमध्ये एक नवे तर चार नव्या कार लॉन्च होणार आहेत. या चारही गाड्या नव्या वैशिष्ट्यांसह ग्राहकांच्या भेटीला येणार आहेत. नव्या वैशिष्ट्यांमुळे या चारही गाड्यांचे लान्चिंग त्यांच्या संबंधित कंपन्यांसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळे या चारही गाड्यांची उत्सुकता आता ग्राहकांना लागून राहिली आहे. 


किआ सेल्टोस फेसलिफ्ट (Kia Seltos facelift)


Kia त्याच्या Seltos फेसलिफ्टसह काही नव्या गोष्टी सुरु करणार आहेत. ही कार  4 जुलै रोजी लॉन्च होणार आहे. नवीन अलॉय व्हीलसह अनेक नव्या फिचर्सचा समावेश या कारमध्ये करण्यात आला आहे. तसेच या कारच्या नवीन लूकमध्ये  फ्रंट-एंड तसेच नवीन हेडलॅम्प, लाइटिंग सिग्नेचर यांचा समावेश करण्यात आला आहे.  तसेच  रिअर स्टाइलिंगसह ही कार लॉन्च करण्यात येणार आहे. या गाडीच्या आतमध्ये ट्विन स्क्रीन ले-आउटसह एक नवीन डॅशबोर्ड सेट-अप देखील समाविष्ट करण्यात आला आहे. नवीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील या कारमध्ये असणार आहे. तसेच या कारमध्ये अनेक आधुनिक वैशिष्ट्यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. 


मारुती सुझुकी इनव्हिक्टो (Maruti Suzuki Invicto)


मारुती सुझुकी 5 जुलै रोजी आपली सर्वात प्रीमियम कार Invicto लॉन्च करणार आहे. ही कार Nexa शोरूमद्वारे ग्राहकांच्या भेटीसाठी येणार आहे. Invicto मध्ये टोयोटाच्या इनोव्हा हायक्रॉसपेक्षा अनेक अत्याधुनिक फीचर्स असणार आहेत.  ग्रिल, लाइटिंग तसेच या गाडीच्या आतमधील रंग अशा अनेक वैशिष्ट्यांसह ही गाडी सुसज्ज असणार आहे.  मॅन्युअल गिअरबॉक्स न मिळणारी ही पहिली मारुती कार असणार आहे. कारण मारुतीच्या  Invicto मध्ये फक्त ऑटोमॅटिक  गिअरबॉक्स असणार आहे. 


ह्युंदाई एक्स्टर (Hyundai Exter)


Hyundai 10 जुलै रोजी लॉन्च करण्यात येणार आहे. यामध्ये Exter सेटसह  SUV लाइन-अप देखील वाढवण्यात आले आहे. Exter हे Hyundai आणि  त्याच्या SUV श्रेणीसाठी सुरुवातीचे  मॉडेल असणार आहे. तसेच या गाडीमध्ये अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्ये असणार आहेत. Hyundai ने Exter ला सनरूफ, डॅशकॅम आणि अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह सुसज्ज केले आहे. तसेच यामध्ये फक्त 1.2 लिटर पेट्रोल इंजिन असणार आहे. तर यामध्ये AMT ऑटोमॅटिक ही सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 


 


मर्सिडीज-बेंझ GLC (Mercedes-Benz GLC)


मर्सिडीज-बेंझ GLC श्रेणीतील नवे मॉडेल लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. या गाडीचे स्टाइलिंग देखील नव्याने करण्यात आले आहे. तसेच यामध्ये नवीन मर्सिडीज डिझाइन अनेक अत्याधुनिक सेवा देखील उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यामध्ये  पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह सी-क्लास प्रमाणे अनेक वैशिष्ट्यांचा समावेश असणार आहे. तसेच अनेक  लक्झरी सुविधांच्या दृष्टीने पॉश लुक देखील या गाडीला देण्यात आला आहे.


हे ही वाचा :


Toyota Century SUV: सेम रोल्स रॉयस लूक... जबरदस्त परफॉर्मन्स; येतेय अद्ययावत फिचर्ससह टोयोटाची आलिशान SUV


Car loan Information:

Calculate Car Loan EMI